Badlapur: बदलापुरातील प्रदुषणकारी कंपन्यांना राज्य सरकारचा दणका, २४ MIDC कंपन्यांवर कारवाई

Action against polluting industries Badlapur: बदलापुरातील रासायनिक प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांवर राज्य सरकारनं कारवाई केली आहे. एकूण २४ कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.
Badlapur
BadlapurSaam
Published On

बदलापूर शहरात रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारनं दणका दिला आहे. आतापर्यंत २४ प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली होती. या कंपन्यांवर कारवाईची मागणी करणारा तारांकित प्रश्न आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना पंकजा मुंडेंनी एकूण २४ कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं सांगितलं.

बदलापूरच्या खरवई परिसरात रासायनिक एमआयडीसीच्या अनेक कंपन्या आहेत. या एमआयडीसीतील कंपन्या अनेकदा रासायनिक वायू हवेत उत्सर्जित करत असतात. हा रासायनिक वायू वातावरणात पसरतात. ज्यामुळे बदलापुरकरांना नेहमीचा त्रास सहन करावा लागतो. या कंपन्यांवर कारवाई करण्याचा तारांकित प्रश्न आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपस्थित केला होता.

Badlapur
Crime News: धडापासून शिर वेगळं अन् हात- पाय मोडून विहीरीत फेकलं, अहिल्यानगरमध्ये नेमकं चाललंय काय?

म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. बदलापूर एमआयडीसीतील एकूण २४ कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिले आहे. यापैकी ५ कंपन्यांवर उत्पादन बंद करण्याची कारवाई करण्यात आली असून, ५ कंपन्यांना अंतरिम आदेश, ५ कंपन्याना प्रस्तावित आदेश आणि ९ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Badlapur
Kalyan News: कल्याणमध्ये 'बीड'चा गांजा तस्कर, १२ किलोंचा गांजा जप्त; 'असा' सापडला पोलिसांच्या तावडीत

याशिवाय रिलायबल गॅल्वनायझर अँड फास्टनर कंपनी हवेत ऍसिडिक वायू उत्सर्जित करते. ज्याचा त्रास बदलापुरकरांना होतो. हाच त्रास लक्षात घेता या कंपनीला नियमांची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ते न केल्याने उत्पादन बंद करण्याचे आदेश या कंपनीला देण्यात आल्याची माहिती सुद्धा पंकजा मुंडे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com