Dhule News: एका क्षणात पत्त्याच्या बंगल्यासारखी ३ मजली इमारत कोसळली, VIDEO पाहून थरकाप उडेल

Vacant Building Collapses in Dhules Shirpur: धुळ्यातील शिरपूर शहरातील जैन गल्लीत ३ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आहे. इमारत कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Dhule
DhuleSaam
Published On

भुषण अहिरे, साम टीव्ही

धुळ्यातील शिरपूर शहरातील जैन गल्लीत ३ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आहे. सुदैवानं या इमारतीत एकही कुटुंब राहत नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. इमारतीत राहणारे कुटुंब एक दिवस आधीच स्थलांतरित झाले होते. इमारत कोसळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

इमारतीला लागून जैन समाज मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू होते. बिल्डींगला लागून जूने घर होते. ते जुने घर आधी पाडण्यात आले आणि त्यामुळे इमारतीच्या एका बाजूचा आधार काढल्याने इमारत कोसळण्याची शक्यता होती. नंतर इमारत आधी खाली करण्यात आली. त्यातील रहिवाश्यांना स्थलांतरित करण्यात आले.

इमारतीतील रहिवाशांनी बिल्डींग खाली केल्यानंतर इमारत अचानक कोसळली. इमारतीत कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. इमारत कोसळल्यानंतर यात जीवितहानी झालेली नाही. इमारत कोसळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यापद्धतीनं पत्त्याचा बंगला कोसळतो. त्याच पद्धतीनं ही इमारत जमीनदोस्त झाली आहे.

Dhule
Crime: धुळवड साजरी करून परतताना नरधमांचा आडवा हात, चालत्या तरुणीचा विनयभंग; उल्हासनगर हादरलं

भरत केशवलाल जैन यांच्या मालकीची वडिलोपार्जित ही इमारत होती. इमारत कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com