Crime: धुळवड साजरी करून परतताना नरधमांचा आडवा हात, चालत्या तरुणीचा विनयभंग; उल्हासनगर हादरलं

Ulhasnagar Holi molestation case: धुळवड साजरी करून परतणाऱ्या तरूणीवर भररस्त्यावर विनयभंगाचा प्रकार घडला आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Crime
CrimeSaam
Published On

उल्हासनगरमध्ये धुळवड साजरी करून परतणाऱ्या तरूणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आला आहे. काही टवाळखोरांनी तरूणीचा रस्ता अडवून विनयभंग केला आहे. नंतर मारहाण देखील झाली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक १मधील फक्कड मंडली ते झूलेलाल मंदिर परिसरात एका तरूणीबरोबर विनयभंगाचा प्रकार घडला आहे. धुळवड साजरी करून तरूणी आपल्या घरी जात होती. यादरम्यान, काही टवाळखोरांनी तिला अडवलं. तरूणीचा रस्ता अडवून तिचा विनयभंग केला.

Crime
Kalyan News: कल्याणमध्ये 'बीड'चा गांजा तस्कर, १२ किलोंचा गांजा जप्त; 'असा' सापडला पोलिसांच्या तावडीत

तरूणीसोबत विनयभंगाचा प्रकार शुक्रवारी घडला. सायंकाळी ही घटना उघडकीस आली. यावेळी मारहाण देखील झाली. मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.

Crime
Crime News: अहिल्यानगरमध्ये मौत का कुआं! दुसऱ्या विहिरीत सापडलं मुंडकं, दोन हात अन् एक पाय

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही तपासले.यापकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भावेश होटचंदानी,रोहित जग्याशी यांच्यासह अन्य काही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com