Buldhana Water Crisis Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Water Crisis : बुलढाण्यात पाणी टंचाईचं संकट गडद; महिनाभर पुरेल इतकाच साठा शिल्लक

Ruchika Jadhav

संजय जाधव, बुलढाणा

वाढत्या तापमानामुळे बुलढाणा जिल्ह्यातही आता भीषण पाणीटंचाईचं संकट गडद होत चाललं आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकल्पात फक्त अकरा टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असून साधारणतः २८ दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यात ६५ गावांना ६७ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सध्या तालुक्याच्या ठिकाणी कुठे ८ दिवसानंतर तर कुठे १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. सुदैवाने जिल्ह्यात कुठेही चारा संकट अद्यापही उद्भवलेलं नाही.

बुलढाणा जिल्ह्यातही दिवसेंदिवस पाणीटंचाईच्या संकटात वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातील मोठ्या तीन प्रकल्पात फक्त ११ टक्के उपयुक्त जलसाठा उरलेला आहे. हा जलसाठा पुढील २८ दिवस पुरेल एवढाच आहे. मात्र सध्याही जिल्ह्यातील सात तालुक्यातील ६५ गावांना ६७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

आगामी काळात लवकर पाऊस पडला नाही तर, जिल्ह्यातील पाणीटंचाईचं संकट मोठ्याप्रमाणात उद्भवणार आहे. सुदैवाने जिल्ह्यात सध्या तरी जनावरांसाठी चारा उपलब्ध असून कुठेही चाऱ्याचं संकट नसल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.

भौगोलिक दृष्ट्या बुलढाणा जिल्ह्याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे घाटावरील भाग आणि दुसरा म्हणजे घाटाखालील भाग. यावर्षी घाटावरील सात तालुक्यात पाणीटंचाईचं संकट मोठं झालं आहे. बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर या तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे.

बुलढाणा शहरात भीषण पाणी टंचाई भासत आहे. ग्रामीण भागात प्रशासनाने असंख्य गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तर घाटाखालील मलकापूर, नांदुरा, खामगाव शेगाव जळगाव जामोद, संग्रामपूर येथे सुद्धा पाणी टंचाई भासत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT