Saam Impact News : बुलढाणा, लातूरमध्ये होल्डिंग स्ट्रक्चर काढण्यास सुरुवात

Buldhana Latur News : घाटकोपर येथे होर्डिंग्ज पडल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर राज्यातील सर्वच शहरामध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे
Saam Impact News
Saam Impact NewsSaam tv

संजय जाधव/ संदीप भोसले 
बुलढाणा/ लातूर
: घाटकोपर येथे होर्डिंग्ज पडल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर राज्यातील सर्वच शहरामध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानुसार बुलढाणा व लातूर शहरात लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढण्याची कारवाई पालिकेकडून करण्यात येत आहे. 

Saam Impact News
Gondia Bribe Trap : नगराध्यक्ष, नायब तहसीलदारासह ४ जण एसीबीच्या ताब्यात; १ लाख ८२ हजाराची घेतली लाच

घाटकोपरच्या घटनेनंतर बुलढाणा शहरात बेकायदेशीर वाढलेले होल्डिंग स्टार्क्चरची बातमी 'साम टीव्ही'ने प्रसारीत केली. यानंतर (Buldhana) बुलढाणा नगरपालिकेने तातडीने एक्शन घेत आज ठिकठिकानचे होल्डिंग स्टार्क्चर काढण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत होल्डिंगमुळे शरहराचे चित्र विचित्र होत चालले होते. मात्र आता जिल्हा प्रशासन एक्शन मोडवर आले असून जिल्हाधिकारी यांनी संबधित विभागाना सूचना करीत बेकायदेशीर होल्डिंग स्ट्रक्चर कारवाई करण्याचे सुचित केले आहे. त्यानुसार बुलढाण्यात ही धडक कारवाईला सुरुवात करण्यात आले आहे. 

Saam Impact News
Nagpur Fraud Case : डुप्लिकेट कुलर बनवून व्यवस्थपकाने कंपनीची केली फसवणूक; मध्यप्रदेश, राजस्थानच्या विक्रेत्यांवरही गुन्हा दाखल

लातूरमध्येही कारवाई 
घाटकोपर (Ghatkopar) येथील दुर्घटनेच्या घटनेनंतर लातूर (Latur) जिल्हा प्रशासन देखील खडबडून कामाला लागले आहे. लातूर जिल्ह्यातील अनाधिकृत होर्डिंग बॅनर तात्काळ हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा होल्डिंग करण्याचं काम सुरू केल आहे. लातूर जिल्ह्यात जवळपास ३६० अनाधिकृत होल्डिंग असल्याचे समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com