Gondia Bribe Trap : नगराध्यक्ष, नायब तहसीलदारासह ४ जण एसीबीच्या ताब्यात; १ लाख ८२ हजाराची घेतली लाच

Gondia News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाया केल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Gondia Bribe Trap
Gondia Bribe TrapSaam tv

शुभम देशमुख 

गोंदिया : गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह नायब तहसीलदार व अन्य ४ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. गोंदियात आठवड्याभरातली हि दुसरी मोठी कारवाई असून या प्रकरणात १ लक्ष ८२ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. 

Gondia Bribe Trap
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील ९० टक्के होर्डिंग धोकादायक; मनपाने दिलेल्या नोटीसला एजन्सीचा ठेंगा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाया केल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Gondia) गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षसह मुख्याधिकारीचा अतिरिक्त कारभार असलेले नायब तहसीलदार व इतर ४ लोकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे ७ मे ला गोंदियाच्या गोरेगाव येथे तहसीलदार व नायब तहसीलदार व अन्य एका इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले होते. त्यानंतर आठवड्याभरातच ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Gondia Bribe Trap
Chandrapur News : पाण्यासाठी ताडोबाला जाणारा मार्ग रोखला; मनपाला कुलूप ठोकण्याचा दिला इशारा

यात नगराध्यक्ष तेजराम किसन मडावी, नायब तहसीलदार शरद विठ्ठल हलमारे, सभापती अश्लेश अंबादे, नगरसेवक महेंद्र जयपाल वंजारी, जुबेर अलीम शेख, राजू शेख व शुभम रामकृष्ण येरणे असे एसीबीने ताब्यात घेतलेल्यांची नावे असून तक्रारदार हे भंडारा जिल्ह्यातील आहेत. तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असून सडक अर्जुनी नगरपंचायत अंतर्गत काही कामे मिळाली होती. या कामाच्या कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता तक्रारदार यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता नगराध्यक्ष यांनी निविदा रकमेच्या १५ टक्के (Bribe) रक्कमेची मागणी केली. त्यानुसार तक्रादाराने एसीबीकडे तक्रार दिली. यानंतर सापळा रचत हि कारवाई करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com