चंद्रपूर : ऐन उन्हाळ्यात चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागातील नागरिकांची पेयजलासाठी वणवण होत आहे. तीन वर्षांपासून अमृत पाणी पुरवठा योजना प्रारंभ झाल्यानंतरही सुमित्रनगर भाग जलवाहिनी जोडणी पासून वंचित आहे. समस्या निवारणासाठी नागरिकांनी संतप्त होत ताडोबाला जाणारा मार्ग रोखला.
चंद्रपूर (Chandrapur) शहर परिसरात महापालिकेकडून अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा जोडणी सुरु आहे. तीन वर्षांपासून या कामाला सुरवात झाली आहे. असे असताना शहरातील सुमित्रनगर परिसरात अद्याप जोडणी झालेली नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येत एकत्र येत रस्ता रोको (Rasta Roko) आंदोलनात सहभाग घेतला. यात ताडोबाकडे जाणारा रस्ता नागरिकांनी रोखून धरला.
महापालिकेला कुलूप ठोकण्याचा दिला इशारा
मनपा व पोलीस प्रशासनाने पुढील दहा दिवसात सुमित्र नगर भागात पाणीपुरवठा (Water Supply) नियमित करण्याचे आश्वासन दिले. मात्र संतप्त नागरिकांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. सुमित्रनगर परिसरात पाणीपुरवठा नियमित न झाल्यास महापालिका कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आंदोलक नागरिकांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.