Dharashiv Water Shortage : धाराशिवकरांसाठी चिंताजनक बातमी; शहराला 9 दिवसाआड पाणीपुरवठा

Water Shortage in Dharashiv : उजणीचे जलाशयात पाणीसाठा नसल्याने शहरात अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहरात नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
Water Shortage in Dharashiv
Dharashiv Water ShortageSaam TV

धाराशिवकरांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. अशात शहराला यापुढे नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धाराशिवमध्ये पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या पंपगृहांना महावितरणमार्फत होणारा विद्युतपुरवठा सध्या सुरू असलेल्या पावसाळी वादळवाऱ्यांमुळे खंडित होत आहे. तसेच उजणीचा जलाशयात पाणीसाठा नसल्याने शहरात अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहरात नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Water Shortage in Dharashiv
Dharashiv Loksabha Election : रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुखने बजावला मतदानाचा हक्क, लातूरमध्ये सहकुटुंब केलं मतदान

नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासह शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

मावळ तालुक्यात देखील पाण्याची टंचाई

राज्यात अनेक जिल्ह्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मावळातील नाणेगावात देखील पाणी टंचाई निर्माण झालीये. मावळ तालुका हा सर्वात जास्त पर्जन्यमान असणारा तालुका समजला जातो. मात्र तीव्र उन्हाच्या झळांनी मावळ तालुक्यात देखील पाण्याची टंचाई आता भासू लागली आहे. मावळ तालुक्यात मोठी आणि छोटी अशी मिळून 11 धरणे असूनही नाणे गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

नाशकात दुष्काळाच्या झळा

पाणी टंचाईची टांगती तलवार नाशिककरांवर देखील आहे. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता वाढली आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या २४ धरणांपैकी ६ कोरडीठाक पडले आहेत. तर ९ धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात शहरासाठी अवघा ८९९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या परिस्थितीत शहराला केवळ ५४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणीपातळी देखील ५९८ मीटरपर्यंत खालावल्यास जॅकवेलपर्यंत पाणी आणणं अवघड होणार आहे.

Water Shortage in Dharashiv
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जरा जपून ठेवा, 'या' भागातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com