Buldhana News: भेंडवळची घटमांडणी थोतांड, राजकीय भाकित केल्यास तक्रार करणार; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इशारा

Buldhana Breaking News: राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांसाठी बहुप्रतिक्षित असलेली भेंडवळची घट मांडणी आज होत आहे. या घट मांडणीत राजकीय भाकित केल्यास निवणडूक आयोगाकडे तक्रार असल्याचा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिला आहे.
Buldhana Breaking News:
Buldhana Breaking News: Saamtv

संजय जाधव, बुलढाणा|ता. १० मे २०२४

भेंडवळची घट मांडणी व भविष्यवाणी ही केवळ थोतांड असून शेतकऱ्यांनी या भाकितांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत या घट मांडणीत राजकीय भाकित केल्यास निवणडूक आयोगाकडे तक्रार असल्याचा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिला आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव तालुक्यातील भेंडगावमध्ये घट मांडणीची परंपरा आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांसाठी बहुप्रतिक्षित असलेली भेंडवळची घट मांडणी आज होत आहे. या घट मांडणीचे अंदाज उद्या सकाळी जाहीर केले जाणार आहेत. या घटमांडणीच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असतो आणि त्यानुसार वर्षभराच्या पीक पाण्याचे, शेतीचे नियोजन शेतकरी करत असतात.

मात्र ही घट मांडणी निव्वळ थोतांड असून अतार्किक व अवैज्ञानिक असून शेतकऱ्यांनी या अवैज्ञानिक मांडणीच्या भाकितांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आले आहे. याशिवाय या घटमांडणीत राजकीय भाकीते सुद्धा केली जातात.

Buldhana Breaking News:
Arvind Kejriwal's Bail News: अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन; लोकसभा निवडणूक प्रचार करणार, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

यावर्षी देशभरात लोकसभा निवडणुका होत आहेत व अजूनही चार टप्पे मतदानाचे बाकी आहेत. देशात सगळीकडे आचारसंहिता लागू आहे . त्यामुळे या घट मांडणीनंतर जर राजकीय भाकिते किंवा अंदाज व्यक्त केला गेला तर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अभयसिंह मारोडे यांनी केला आहे.

दरम्यान, भेंडवळच्या या घटमांडणीला तब्बल ३७० वर्षांची परंपरा आहे. या मांडणीतून वर्षभरातील पाऊस, पिके, संकटे, राजकीय घडामोडी याबाबत भाकित वर्तवले जाते. मराठवाडा, खानदेश, विदर्भातून लाखो शेतकरी हे भाकित ऐकण्यासाठी येतात.

Buldhana Breaking News:
Lightning Strike : वीज अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू; सासरी गेला असताना घडली घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com