Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana : शेतातून घरी परतत असताना दुर्दैवी अंत; नदीत पाय घसरून तरुणाचा बुडून मृत्यू

Buldhana News : शेतातील काम आटोपल्यानंतर घरी परत येत होता. वाटेत असलेल्या वान नदीपात्रातुन जात असताना त्याचा पाय घसरला असता तो नदीच्या खोल पाण्यात जाऊन बुडाला. त्याला बाहेर निघता आले नाही

संजय जाधव

बुलढाणा : शेतात कामासाठी गेल्यानंतर दिवसभर काम केले. शेतातील काम आटोपून घरी येत असताना नदीतून मार्गस्थ होत असताना पाय घसरला. यामुळे नदीतील खड्ड्यात पडल्याने तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमा रेषेवरील काकनवाडा बुद्रुक येथे हि घटना घडली असून सिद्धार्थ रामदास भिलंगे (वय ३८) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत सिद्धार्थ भिलंगे हा सकाळी शेतात कामासाठी गेला होता. शेतातील काम आटोपल्यानंतर घरी परत येत होता. वाटेत असलेल्या वान नदीपात्रातुन जात असताना त्याचा पाय घसरला असता तो नदीच्या खोल पाण्यात जाऊन बुडाला. याठिकाणाहून त्याला बाहेर निघता आले नाही. 

कुटुंबावर दुःखाचा डोंगर 

यामुळे नदीच्या खोल पाण्यात बुडून सिद्धार्थ याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थच्या मृत्यूमुळे घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

परभणीतही तरुण गेले वाहून 

परभणीच्या धारणगाव येथील गजानन डुकरे हा तरुण काल दुधना नदीपात्रामध्ये वाहून गेला होता.  दरम्यान त्याचा मृतदेह घेवून धारणगाववासिय जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहे. धरणगाव परिसरामध्ये समसापूरचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे धारणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅक वॉटर राहत असून आणि या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही. जे जाण्याचा प्रयत्न करतात ते पाण्यामध्ये बुडून मृत्यू होत असल्याची घटना सातत्याने होत असल्याने गावकरी संतापले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सामच्या बातमीचा इम्पॅक्ट: नीट पेपरफुटीनंतर त्या इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर होणार कारवाई, शिक्षण विभागाचे आदेश

Maharashtra News Live Update: आदिवासी बांधवाच्या जागेवर बेकायदेशीर घरकूल बांधकाम

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची घोषणा; कोण-कोणाला मिळालं तिकीट? जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावरचे डाग आणि टॅन कमी करुन ग्लोईंग चेहरा पाहिजे? रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT