Jalgaon : अति पावसाने होत्याचे नव्हते केले; कर्ज फेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : पावसाचे आगमन झाल्यानंतर सतत पाऊस सुरु राहिला. शिवाय उडीद, मुगाला फुल आणि शेंगा लागण्याच्या काळात पाऊस गायब झाला. तर सध्या सतत पाऊस होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी सुरवातीपासूनच अडचणीत सापडला आहे. अति पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान लहरी हवामान, हलकी जमीन आणि दिवसेंदिवस कर्जाचा बोझा वाढत असल्याने कर्ज फेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना जळगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. 

जळगाव तालुक्यातील देव्हारी येथील शेतकरी राजू शंकर तळेकर (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. यंदा सुरवातीला मान्सून लांबला होता. यानंतर पावसाचे आगमन झाल्यानंतर सतत पाऊस सुरु राहिला. शिवाय उडीद, मुगाला फुल आणि शेंगा लागण्याच्या काळात पाऊस गायब झाला. तर सध्या सतत पाऊस होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

Jalgaon News
Yawal Crime : शेजाऱ्याचे भयानक कृत्य; फूस लावून बालकाचे अपहरण करत केली हत्या, गच्चीवरच मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

शेतीसाठी ८ लाखांचे कर्ज 

दरम्यान राजू तळेकर यांचे देव्हारी शिवारात शेत असून त्यांनी कापसाची लागवड केली आहे. यंदा अति पावसामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. यामुळे यातून चांगले उत्पादन येण्याची शेतकऱ्याची आशा मावळली आहे. तर शेतीसाठी अगोदरच विकास सोसायटी व खासगी, असे सात ते आठ लाख रुपयांचे त्यांच्यावर कर्ज आहे. शेतातून उत्पादन येणार नसल्याने कर्ज फेड कशी करायची; या विचारात त्यामुळे ते तणावात असायचे. 

Jalgaon News
Taloda Heavy Rain : तळोदा तालुक्यात अतिवृष्टी; २४ तासांपासून पावसाची संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कटुंबीयांचा आक्रोश 

तणावात असलेल्या राजू तळेकर यांनी ५ सप्टेंबरला शेतात जाऊन विष प्राशन केले. हा प्रकार आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच तळेकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर कुटुंबीयांची एकच आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com