buldhana saam tv
महाराष्ट्र

New Babies Born : तिळ्यांच्या जन्माने जाधव कुटुंबियांत हर्षाेल्लास; आईसह तान्हुले ठणठणीत

सोनोग्राफीत तीन बाळं असल्याचे डॉक्टरांनी पाहिले होते.

संजय जाधव

Buldhana News : एका महिलेने चक्क तिळ्यांना जन्म दिला आहे. विश्वास बसत नाही ना ! पण ही घटना खरी आहे. ती बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात घडली आहे. बऱ्याचदा जुळ्यांना जन्म दिल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. पण जिल्ह्यातील खामगाव शहरातील एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. यात दोन मुली आणि एका मुलगा आहे. (Maharashtra News)

या तिळ्यांच्या आईचे नाव आहे. सौ. सपना सचिन जाधव यांनी जन्म दिलेल्या बाळांचा म्हणजेच तिघांच्या जन्मात एकेक मिनिटाचा फरक आहे. सपना यांची तब्येत चांगली आहे. सपना जाधव यांची ही प्रसूतीची पहिलीच वेळ होती. तीन बाळ होतील असे सोनोग्राफीत कळले होते. त्यामुळे गरोदरपणातच पत्नीची विशेष काळजी घेत असल्याचे पती सचिन यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. तिन्ही बाळांचे वजन क्रमश: १ किलो ५०० ग्रॅम, १ किलो ५०० आणि १ किलो ३०० असे आहे. तिळ्यांच्या जन्माने कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

खामगावातील ठेंग हॉस्पिटलमध्ये एका महिलेने एकाच वेळी तीन बाळांना जन्म दिला या ठिकाणी असणारे डॉक्टर प्रशांत ठेंग आणि प्रियांका ठेंग यांनी या महिलेची सुखरूप प्रस्तुती केली आहे.

एक 22 वर्षे महिला गरोदर असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर तिच्या गर्भाशयात तिळे असल्याचे सांगण्यात आले. सदर महिलेवर विशेष लक्ष ठेवून तिच्यावर उपचार सुरू केले.

यामध्ये गर्भ नऊ महिने व्यवस्थित वाढविला तसेच नऊ महिन्यापर्यंत तिच्या गर्भास कोणताही धोका होऊ नये याची काळजी घेतली व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर कमी असल्यामुळे त्याला थोड्या प्रमाणात धोका निर्माण झाला होता मात्र डॉक्टर प्रशांत ठेंग आणि त्याच्या टीमने या तिन्ही बाळांवर उपचार केले आणि सिजरींगच्या माध्यमाने प्रसूती होऊन तिन्ही बाळ सुखरूप आहेत.

ठेंग हॉस्पिटलमध्ये (khamgaon) आतापर्यंत दहा हजाराच्यावर प्रस्तुती झालेले असून यामध्ये जुळे होण्याचे अनेक प्रकरणे आहेत मात्र तीळे होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टर डॉ. प्रशांत ठेंग यांनी सांगितले.

नवजात बालकांमध्ये दोन मुलं आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुलीचे वजन प्रत्येकी दीड किलो तर मुलांचे वजन १३०० ग्राम आहे. बाळांचे वजन कमी असल्यामुळे दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी माहिती डॉ. प्रियांका ठेंग यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT