Abdul Sattar News : शेतक-यांना फसविणारे 10 वर्ष जेलमध्ये पाठविणार : अब्दुल सत्तार; 'त्या' प्रश्नावर मंत्र्यांचा काढता पाय

या धाडी मीच टाकण्यास सांगितले असेही मंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले.
abdul sattar, akola, farmers, seeds
abdul sattar, akola, farmers, seedssaam tv

Akola News : शेतक-यांना बाेगस बियाणे, खतांचे विक्री करणा-यांना दहा वर्ष शिक्षेची तरतूद करण्यासाठी आगामी काळातील अधिवेशनात कायदा करणार आहाेत असे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (maharashtra agricultural minister abdul sattar) यांनी सूताेवाच दिले. ते अकाेलाे येथे एका कार्यक्रमासाठी आले हाेते. त्यावेळी माध्यमांशी बाेलतना सत्तार यांनी राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी असल्याचे म्हटलं. (Latest Marathi News)

abdul sattar, akola, farmers, seeds
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 : लोणंद पालखीतळ : वारक-यांच्या दिंड्यांबाबत महसूलमंत्र्याची सक्त सूचना

अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या धाडसत्रात खाजगी व्यक्ती असल्याचे समोर आल्याने आज अकाेला येथे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी काढता पाय घेतला. तसेच त्यांनी या धाडी मीच टाकण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले.

abdul sattar, akola, farmers, seeds
Dhule News : छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय जय श्रीराम, धुळे शहरात हिंदू संघटनांच्या जनआक्रोश मोर्चा (पाहा व्हिडिओ)

या धाडीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत काही खासगी व्यक्ती तथा कृषी मंत्री यांच्या जवळचे नागरिक असल्याचा प्रश्न माध्यमांनी सत्तार यांना विचारला असता त्यांनी गवळी हा कृषी अधिकारी असून भट्टड हा माझा पीए नसल्याचे म्हटले. माझा पीए हा कुलकर्णी असून ते मुंबईत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान माध्यमांच्या प्रश्नांना बगल देत मंत्री सत्ता यांनी रस्ता दिसेल त्या दिशेने धाव घेतली. शेवटी सुरक्षा रक्षकांनी त्यांना दुसरा रस्ता दाखविल्यानंतर ते हळूहळू चालले आणि माध्यमांशी थोडक्यात बोलून निघून गेले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com