Dhule News : डाेक्यावर भगव्या टाेप्या, हातात भगवे झेंडे घेत एक एक चाैक पुढे सरकत आज असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धुळ्यात सामाजिक तेढ निर्माण करणा-यांना थारा नाही असा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) पुतळ्यापासून हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्राेश माेर्चास (dhule morcha) भगवान श्रीराम यांची आरती करून प्रारंभ झाला. (Maharashtra News)
धुळे शहरात काही दिवसांपुर्वी सामाजिक तेढ निर्माण करणा-या घटना घडत आहेत. दाेन दिवसांपुर्वी शहरातील एका धार्मिक स्थळाला देखील लक्ष करण्यात आले. त्यामुळे हिंदुत्तववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज विविध संघटनांनी माेर्चाचे आवाहन केले हाेते. त्यास आज सकाळी प्रारंभ झाला. या माेर्चा असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या माेर्चात महिलांची संख्या लक्षणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय जय श्रीराम अशा घाेषणा देत माेर्चेकरी पुढे सरकत आहेत.
या माेर्चात सहभागी झालेले खासदार सुभाष भामरे म्हणाले तीन दिवसांपुर्वी औरंग्याच्या काहींनी सकल हिंदु धर्माच्या भावना दुखावल्या. त्यामुळे आजचा हिंदुचा प्रक्षाेभ दिसून येत आले. या नतद्रष्टांवर कठाेर कारवाई करा या मागणीसाठी आम्ही सर्व एकत्र आलाे आहाेत.
या माेर्चाचे आयोजकांतर्फे आमदार फारुख शहा (mla farooq shah) यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. एमआयएमचे आमदार फारुख शहा यांच्यामुळेच धुळ्यात अनुचित प्रकार घडत असल्याचा आरोप माेर्चाचे आयाेजकांनी केले आहे. टिपू सूलतानचे उदात्तीकरण आमदारांनी केल्याचाही आराेप केला गेला.
पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त
दरम्यान आजच्या माेर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदाेबस्त आहे. वरिष्ठ पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार धुळे शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सीआरपीसी १४४ (२)नुसार मनाई आदेश पारीत करण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता पाळावी व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.