Kolhapur Bandh Update : कोल्हापुरातील मुस्लिम संघटनांचे पोलिसांना पत्र, समाजास केलं हे आवाहन

काेल्हापूरातील नियंत्रित परिस्थिती पुन्हा बिघडली. लक्ष्मीपूरी परिसरात दुकानांवर दगडफेक झाली.
kolhapur, kolhapur bandh, police, hindu, muslim, social media
kolhapur, kolhapur bandh, police, hindu, muslim, social mediasaam tv
Published On

Kolhapur Bandh : समाज माध्यमात वादग्रस्त स्टेटस ठेवलेल्यांवर कारवाई करावी या मागणी आज (बुधवार) काेल्हापूरात हिंदुत्ववादी संघटना बंदचे आवाहन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चाैकात जमा झाले. यानंतर आंदाेलन छेडण्यात आले. या आंदाेलन काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काहींवर पाेलिसांनी लाठीचार्ज (kolhapur lathicharge) केला. त्यामुळे आंदाेलक आक्रमक झाले. त्यातून दगडफेकीच्या घटना घडल्या. (Maharashtra News)

kolhapur, kolhapur bandh, police, hindu, muslim, social media
Shivrajyabhishek Din : तोपर्यंत मी गडउतार होणार नाही : युवराज संभाजीराजे छत्रपती (पाहा व्हिडिओ)

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शवत असून समाजकंटकांवर ठाेस आणि कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा काेल्हापूरातील मुस्लिम समाजाने पाेलिस अधीक्षकांना पत्र देऊन व्यक्त केली आहे.

मुस्लिम संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (kolhapur sp mahendra pandit) यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या विचारांना आदर्श मानून कोल्हापुरातील मुस्लिम समाज जगत आहे. राजर्षी शाहू महाराज (rajarshi shahu maharaj) यांचं शहर असलेल्या कोल्हापुरात काही समाजकंटकांनी शिवरायांवर (social media) आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

kolhapur, kolhapur bandh, police, hindu, muslim, social media
Sangamner Morcha News: संगमनेरला हिंदु जन आक्राेश माेर्चा; 'समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही समर्थ' (पाहा व्हिडिओ)

शहराचे सामाजिक सौंहर्द आणि शांतता बिघडवणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही, पोलिसांनी संशयित आरोपींवर कठोर कारवाई करत त्यांना ठेचून काढावे अशी मागणी देखील मुस्लिम संघटनांनी पाेलिस दलास पत्राद्वारे केली आहे. समाजकंटांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापुरकरांनी शांतता, एकोपा आणि बंधुभाव बिघडू देऊ नये अशी अपेक्षा मुस्लिम संघटनांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com