Buldhana Mehkar News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana : मेहकरमध्ये सोयाबीन बियाणे पॅकिंग करून विक्री; बोगस बियाणे असल्याचा मनसेचा आरोप, कंपनीकडे परवाना असल्याचा दावा

Buldhana Mehkar News : गोडावूनमध्ये सोयाबीन विकत घेऊन त्याची ब्रँडेड गोल्ड स्टार सिड्स कंपनीच्या नावाने पॅकिंग केली जात होती. हे बियाणे शेतकऱ्यांना विक्री केले जात असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब उघड केली

संजय जाधव

बुलढाणा : सध्या पेरणीचे दिवस सुरु असून शेतकरी बियाणे, खते विकत घेऊन शेती कामाला लागला आहे. मात्र या काळात अनेक ठिकाणी बोगस बियाणे तयार करून शेतकऱ्यांना विकले जात असून फसवणूक केली जात आहे. असाच एक प्रकार मेहकर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला असून बोगस बियाणे असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मात्र कंपनीकडे परवाना असल्याचे स्पष्टीकरण कृषी विभागाने केले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराच्या बाहेर एका गोडावूनमध्ये सोयाबीन विकत घेऊन त्याची ब्रँडेड गोल्ड स्टार सिड्स कंपनीच्या नावाने पॅकिंग केली जात होती. हे बियाणे शेतकऱ्यांना विक्री केले जात असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब उघड केली. त्याठिकाणी असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी मनसेच्या कार्यकर्त्यांची हुज्जत देखील झाली. दरम्यान कृषी विभागाला ही कळविण्यात आले. 

मनसेकडून कारवाईची मागणी 

कृषी विभागाने या ठिकाणी धाव घेत पंचनामा केला. याठिकाणी लातूर येथील गोल्ड स्टार कंपनीच्या नावाने सोयाबीन बियाणे पॅकिंग होत असल्याचे दिसून आले. शिवाय बॅग पॅकिंग करण्याचे साहित्य, रिकाम्या बॅग याठिकाणी आढळून आल्या आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांत भीती पसरली असून मनसेने अशा कंपनीवर कृषी मंत्र्याने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

परवाना असल्याचे स्पष्टीकरण 

दरम्यान कृषी विभागाने कंपनी आणि बियाणांचा पंचनामा केला. यात कंपनीकडे बियाण्याचा परवाना असल्याचे कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. शिवाय सखोल चौकशी करून त्यात काही अनियमतता आढळल्यास योग्य ती कारवाई केल्या जाईल; अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : थरारक! इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली; दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT