Malkapur News Saam tv
महाराष्ट्र

Malkapur News : वादळी वाऱ्याचा तडाखा..तीन आठवड्यांपासून सहा गावात वीज नाही, पिके सुकू लागली; अधिकाऱ्यांना कोंडून शेतकऱ्यांचा ठिय्या

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर परिसरात गेल्या २६ मे रोजी वादळी पावसाने थैमान घातले होते. यात मोठे नुकसान ही झालं होत.

संजय जाधव

बुलढाणा : मलकापूर परिसरात मी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यावेळी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकल्याने विद्युत तारा तुटल्या होत्या. तेव्हापासून म्हणजे साधारण तीन आठवडे झाले तरी सहा गावांमधील वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तर पाण्याअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले. महावितरणच्या उपकेंद्रात धडक देत अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठिय्या आंदोलन केले.  

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मलकापूर परिसरात गेल्या २६ मे रोजी वादळी पावसाने थैमान घातले होते. यात मोठे नुकसान ही झालं होत. विज पुरवठा करणारे अनेक खांब पडल्याने परिसरातील जवळपास ७० ते ८० गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. अनेक दिवस गावे अंधारात होती. मात्र तीन आठवडे उलटून ही मलकापूर (Malkapur) परिसरातील बेलाड, घिर्णी, माकनेर, बहापुरा, पान्हेरा व वाघुड या सहा गावातील व शेतीतील विज पुरवठा अदयाप सुरळीत झालेला नाही. 

उपकेंद्राला टाळे लावून शेतकऱ्यांचा ठिय्या 

सध्या अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन लागवड केली असून पावसाने दांडी मारल्याने त्यांना सिंचनाद्वारे पीक वाढवायचं आहे. मात्र विज पुरवठा नसल्याने पीक सुकत चालले आहेत आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे यामुळेच शेतकरी संतप्त झाले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी बेलाड येथील वीज उपकेंद्राला टाळ ठोकून अधिकाऱ्यांना कोंडून ठिय्या दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT