Buldhana Crime News
Buldhana Crime News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: एकाच दिवशी दोन जणांनी उचललं टोकाचं पाऊल; भयानक घटनेनं अख्खं गाव हळहळलं

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Crime News: बुलडाणा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील साखरखेर्डा येथून ८ किमी अंतरावर असलेल्या शेंदूर्जन गावातील दोन जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. मयूर बाजीराव इंगळे (वय १९ वर्ष) आणि विठ्ठल शिंगणे (वय ५५ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.  (Breaking Marathi News)

एकाच दिवशी घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे परिसरात (Buldhana News) मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मयुर बाजीराव इंगळे या १९ वर्षीय तरुणाने गावानजीक असलेल्या एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवयात्रा संपवली. त्याने असं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. (Latest Marathi News)

मयुर याच्या मागे आई, १ बहीण आणि १ भाऊ असा परिवार आहे. दुसरीकडे विठ्ठल शिंगणे या शेतकऱ्याने टीनाच्या अँगलला शेतीकामातील दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं (Crime News) कारणही समजू शकलेलं नाही. शिंगणे यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा आणि १ मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, एकाच दिवशी गावातील दोन जणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने शेंदूर्जन गावात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, साखरखेर्डा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रामदास वैराळ करीत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT