Marathwada Child Marriage: चिंताजनक! मराठवाड्यात बालविवाहाच्या प्रमाणात मोठी वाढ

Rate Of Child Marriage Increased In Marathwada: चिंताजनक! मराठवाड्यात बालविवाहाच्या प्रमाणात मोठी वाढ
Child marriage
Child marriageSaamTv

Child Marriage Increased In Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात बालविवाहाच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. कायदा असूनही धाक नसल्याने आणि सरकारी यंत्रणा सक्षमपणे कार्यरत नसल्याने बालविवाह थांबत नाहीत. गेल्या पंधरवड्यात एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात 11 बालविवाह रोखलेत तर अनेक बालविवाह पार पडलेत.

डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्रात बालवयातच मुलींची लग्न लावली जातायत. हे प्रमाण आता अधिक वाढत चाललंय. संभाजीनगरातील आकडेवारीने संपूर्ण व्यवस्थेला विचार करायला लावलंय.

Child marriage
Dipali Sayyad News : दाऊदमुळे दीपाली सय्यद यांना सेनेत प्रवेश मिळाला? सय्यद यांच्या माजी पीएचा आरोप!

कारण 15 दिवसात 11 बालविवाह रोखण्यात आलेत तर अनेक विवाह हे गुपचूप पार पडलेत. बालविवाह रोखण्यासाठी कायदा (Child Marriage Act) आणि त्यासोबत मोठी यंत्रणाही राज्यात असताना बालविवाह कमी होण्याऐवजी ते वाढतच असल्याचं समोर आलंय.  (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News ) जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 11 बालविवाह रोखण्यात यश आलेय. मात्र 50 पेक्षा अधिक बालविवाह गुपचूप उरकल्याचा अंदाज आहे. सध्या सगळीकडे लग्नाची धूम सुरू आहे. त्यात अल्पवयीन मुलींचे लग्न आई- वडील लावून देत असल्याचे समोर येत आहे. संभाजीनगरच्या बालकल्याण समितीसमोर मागील 15 दिवसांमध्ये 11 बालविवाह रोखल्याची प्रकरणे सादर झाली.

Child marriage
New Parliament Inauguration Row : अहंकाराच्या विटांनी... संसद भवन उद्घाटन वादात राहुल गांधी यांचीही उडी

एका विवाहात नवरीचे वय 16, तर नवरदेव 40 वर्षांचा प्रौढ होता. 40 वर्षांच्या जरठ प्रौढास लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्यामुळे त्याने गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला शोधून लग्नाचा घाट घातल्याचे बालकल्याण समितीच्या चौकशीत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलीचे वय 18 आणि मुलाचे 21 वर्षे होणे आवश्यक आहे. दोघांपैकी एकाचेही वय पूर्ण झालेले नसेल तर लग्न बेकायदेशीर ठरते. मात्र कायदा असूनही भीती नसल्यामुळे सर्रासपणे बालविवाह सुरू आहेत.

यातच एखाद्या वेळी कोणीतरी माहिती दिल्यानंतरच सरकारी यंत्रणा तिथे पोहोचून विवाह रोखतात. मात्र काही ठिकाणी तो अगोदरच पार पडलेला असतो. आता ही स्थिती राहिली तर बालविवाहाच्या प्रमाणात मोठी वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जातेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com