Sant Muktabai Palkhi Saam tv
महाराष्ट्र

Sant Muktabai Palkhi : संत मुक्‍ताबाईची पालखी बुलडाण्यातील राजुर घाटात दाखल; बैलजोडीच्या साह्याने चढला राजुर घाट

Buldhana News : संत मुक्ताईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. संत मुक्ताई संस्थानाच्यावतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते. दिंडीचे यावर्षीचे हे ३१५ वे वर्ष आहे

संजय जाधव

बुलढाणा : आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताईची पालखी कोथळी मुक्ताईनगरातून परंपरेनुसार पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. हा पालखी सोहळा प्रस्थान करत मलकापूर- मोताळा या मार्गाने राजुर घाटामध्ये पोहचला आहे. पालखी बुलढाण्यातील राजूर घाट बैलबाडीच्या साहाय्याने चढला असून प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघा राजुर घाट दुमदुमला होता. 

वारी दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो. त्या संत मुक्ताईंच्या दिंडीला (Muktai Palkhi) तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. संत मुक्ताई संस्थानाच्यावतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते. दिंडीचे यावर्षीचे हे ३१५ वे वर्ष आहे. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व (Jalgaon) जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे. संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत २८ दिवसांत तब्बल ६०० किलोमीटरचे अंतर पार करत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो. (Pandharpur) पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो.

बुलढाण्यात आज मुक्काम 

संत मुक्ताबाई पालखी आज बुलडाणा (Buldhana) येथे मुक्कामी असणार आहे. सकाळी पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. दरवर्षी बुलढाण्याच्या प्रसिद्ध असलेल्या राजुर घाटामध्ये पालखी एक बैल जोडीच्या रथावर नेत होते. मात्र बैलांना राजूर घाट चढणे शक्य नसल्याने यावर्षी दोन बैल जोडीच्या साहाय्याने हा घाट पार करत आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT