Beed Police Bharti : पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे सापडले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

Beed News : भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवाराने चक्क उत्तेजक द्रवाचे इंजेक्शन आणल्याचे समोर आले आहे
Beed Police Bharti
Beed Police BhartiSaam tv

बीड : बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आले आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून आता या इंजेक्शनची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

Beed Police Bharti
Vasai News : झाडाखाली दबून वृद्धेचा मृत्यू; दोन दिवसापूर्वी बेपत्ता झाल्याची होती तक्रार

राज्यात ठिकठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. दरम्यान (Beed) बीडमध्ये सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवाराने चक्क उत्तेजक द्रवाचे इंजेक्शन आणल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर येताच (Police) पोलिसांनी सदर उमेदवाराला ताब्यात घेत त्याच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 

Beed Police Bharti
Chalisgaon Accident : भरधाव ट्रकच्या धडकेत दोघा मित्रांचा मृत्यू; चाळीसगाव- धुळे महामार्गावर अपघात

थकवा न येण्यासाठी वापर 
दरम्यान हे इंजेक्शन टर्मिन इंजेक्शन असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. साधारणतः व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये, यासाठी मीफेट्रामाईन घटक असलेले टर्मिन नावाचे इंजेक्शन घेतले जाते. हे इंजेक्शन तेच असावे असा अंदाज आता अधिकाऱ्यांनी वर्तवला असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळू शकणार आहे.

इंजेक्शन तपासणीसाठी एफडीएकडे 

पोलिसांनी हे इंजेक्शन जप्त केले असून याबाबत एफडीएला बोलाविण्यात आले आहे. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सॅम्पल घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून या आढळलेल्या इंजेक्शनची सॅम्पल मुंबई येथे प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत. दरम्यान बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून उमेदवारांच्या बॅगांचे देखील आता कसुन तपासणी केली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com