Vasai News : झाडाखाली दबून वृद्धेचा मृत्यू; दोन दिवसापूर्वी बेपत्ता झाल्याची होती तक्रार

Vasai News : विरार येथून बेपत्ता असलेल्या मंजुळा झा (वय ७०) या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी विरारच्या बोळींज येथे आढळला आहे
Vasai News
Vasai NewsSaam tv

महेंद्र वानखेडे

वसई : दोन दिवसांपासून विरारमधून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह सकाळी आढळून आले. वासी- विरारमध्ये बुधवारी पावसामुळे पडलेल्या चिंचेच्या झाडाखाली दबून महिलेचा मृत्यू झाला होता. सदरची घटना दोन दिवसांनंतर आज उघडकीस आली आहे. 

Vasai News
Bhandara News : भंडाऱ्यात १९ कृषी केंद्रांना खत, बियाणे विक्रीवर बंदी; कृषी विभागाच्या तपासणीत आढळल्या त्रुटी

विरार (virar) येथून बेपत्ता असलेल्या मंजुळा झा (वय ७०) या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी विरारच्या बोळींज येथे आढळला आहे. मंजुळा झा या काही दिवसांपूर्वी विरार पश्चिमेच्या पद्मावतीनगर येथील ऋषभ टॉवरमध्ये राहत असलेल्या मुलाकडे आली होती. सकाळी नातवाला शाळेत सोडून मंदिरात जात असे. मंदिरात फुले वाहण्यासाठी ती आसपासच्या परिसरातून फुले तोडून आणत असे. दरम्यान १९ जूनला ती नेहमीप्रमाणे नातवाला सोडण्यासाठी बाहेर गेली आणि तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती.

Vasai News
Nashik News : नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गैरकारभार; अध्यक्षांच्या भेटीत आले उघडकीस, केंद्रांची होणार चौकशी

फुले तोडायला गेली असता झाडाखाली दबली गेली 

तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. याप्रकरणी अर्नाळा सागरी (Police) पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल होती. तिचा शोध घेत असताना पोलिसांना ती बोळींज येथे फुले तोडण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला असता चिंचेचे मोठे झाड पडलेले दिसले. तेथे शोध घेतला असता दुर्गंधी आली. तेव्हा झाड बाजूला केले असता मंजुळा झा यांचा मृतदेह आढळून आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com