Buldhana News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: सिंदखेडराजा ते शेगाव मार्ग लवकरच समृद्धी महामार्गाला जोडला जाणार; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Samruddhi Mahamarg: 109 किलोमीटरचा भक्तिमार्ग तयार करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सिंदखेडराजा ते शेगाव असा भक्तिमार्ग बुलढाणा जिल्ह्यात तयार होणार आहे.

संजय जाधव

Buldhana News:

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गा लगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक स्थळांना जोडण्याच्या कामांना आता वेग आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संतनगरी शेगाव असा 109 किलोमीटरचा भक्तिमार्ग तयार करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सिंदखेडराजा ते शेगाव असा भक्तिमार्ग बुलढाणा जिल्ह्यात तयार होणार आहे.

हा महामार्ग ग्रीन कॉरिडोर असणार आहे. यामुळे शेगाव हे समृद्धी महामार्गावरून जोडल्या जाणार आहे. या महामार्गाचे काम एमएसआरडीसी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाला धार्मिक केंद्र जोडणारा हा भक्तिमार्ग असणार आहे.

भक्ती मार्गाची वैशिष्ट्ये

हा महामार्ग 109 किलोमीटरचा असेल.

जिल्ह्यातील पाच तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हा ग्रीनफिल्ड महामार्ग असेल.

हा महामार्गामुळे शेगाव हे तीर्थक्षेत्र समृद्धी महामार्गाला जोडल्या जाईल.

ऐतिहासिक स्थळाला धार्मिक केंद्राची जोडल्यामुळे या महामार्गाचे नाव भक्तिमार्ग ठेवण्यात आल आहे.

समृद्धी महामार्ग लगतच्या जिल्ह्यातील अनेक स्थळांना समृद्धी महामार्ग जोडण्याच्या योजनेला सरकारने आता सुरुवात केली आहे. महामार्ग जोडल्यानंतर येथील नागरिकांना येथून जलद गतिने प्रवास करता येणार आहे. समृद्धीमहामार्गा लगत असलेले अनेक स्थळे आता समृद्धी महामार्गाशी अशआ पद्धतीने जोडले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli News : गडचिरोलीच्या श्वेताचा दुबईत डंका; आशियाई पॅरा गेम्समध्ये केला ऐतिहासिक पराक्रम

Kitchen Hacks : वॉशिंग मशीन नियमित साफ कशी करावी? जाणून घ्या स्मार्ट टिप्स

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

SCROLL FOR NEXT