Crime News
Crime NewsSaam Tv

Jaipur Crime News: क्रिकेटमधील पराभवानंतर तरुणाचा राग अनावर; मित्राच्या डोक्यात केला बॅटने हल्ला; जयपूरमधील घटना

Crime News: जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूरमध्ये क्रिकेटमध्ये हरल्यामुळे एका मुलाने दुसऱ्या संघातील १५ वर्षीय मुलाच्या डोक्यात बॅटने हल्ला केला. यात त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Published on

Jaipur 15 Year Old Boy Killed By His Friend After Loss In Cricket Match:

जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूरमध्ये क्रिकेटमध्ये हरल्यामुळे एका मुलाने दुसऱ्या संघातील १५ वर्षीय मुलाच्या डोक्यात बॅटने हल्ला केला. यात त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मंगळवारी झालावाडच्या भवानी मंडी येथे दोन संघांमध्ये क्रिकेट सामना सुरु होता. क्रिकेट सामना हरल्यामुळे एकाचा राग अनावर झाला आणि त्याने दुसऱ्या मुलाच्या डोक्यात बॅटने हल्ला केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश साहू हे मृत मुलाचे नाव आहे. तर मुकेश मीना (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. तो भवानी मंडी येथील राजस्थान टेक्स्टाईल्स मिल्स लेबर कॉलनीत राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हा दहावीत शिकत होता. तर मुकेश मीना बीएच्या अंतिम वर्षात होता. हे दोघेही मित्र होते. हे रोज कॉलनीतील मैदानात क्रिकेट खेळायला जायचे.

Crime News
घरावर लिंबू, बाहुली... ठाकरे गटाच्या महिला पदाधिका-यांचा भानामतीचा दावा, पाेलिसांत धाव

मंगळवारी दुपारी प्रकाश आणि मुकेशच्या दोन संघामध्ये क्रिकेटचा सामना रंगला. त्यात प्रकाशचा संघ जिंकला आणि मुकेशची टीम हरली. आपली टीम हरल्यामुळे मुकेशला राग आला त्याने रागाच्या भरात प्रकाशच्या डोक्यावर बॅटने हल्ला केला. यात प्रकाश जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कॉलनीत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.

Crime News
Kandivali News: क्रूरतेचा कळस! फक्त तीन हजारांसाठी ज्येष्ठ महिलेची दगडाने ठेचून हत्या; कांदिवलीतील घटनेने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com