Buldhana Accident Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Accident: रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनामुळे भीषण अपघात; कामावरुन घरी परतणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू

Accident News: महामार्गावरील अडथळा करणाऱ्या वाहनामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याला जीव गमावावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana News: बुलढाण्याच्या नागपूर- पुणे महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात कामावरुन घरी निघालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनामुळे हा अपघात झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर पुणे (Nagpur Pune Highway) या मार्गावर दुसरबीड येथे रस्त्यावर नेहमी असंख्य वाहने उभी असतात. त्यामुळे महामार्गावरील इतर वाहनांना अडथळा होत असतो तर बरेच अपघात होतात. अश्याच अडथळा करणाऱ्या वाहनामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याला जीव गमावावा लागला.

आडगावराजा येथून आपली ड्युटी करून घरी येण्यासाठी निघालेले वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत प्रभाकर ताठे हे दुसरबीड येथील बसथांब्यावर उभ्या असलेल्या व वाढत्या अतिक्रमणाचे बळी ठरले. समोर चालत असलेल्या ट्रकला पास करण्याच्या प्रयत्नात महामार्गावरच उभ्या असलेल्या एका तीन चाकी रिक्षाचा अडथळा निर्माण होऊन डॉ.प्रशांत ताठे यांची दुचाकी रिक्षाला धडकली.

याचवेळी शेजारून जाणाऱ्या ट्रकचा धक्का लागून खाली पडले. या अपघातात त्यांना गंभीर दुःखापत झाल्याने जालना येथे उपचारार्थ भरती केले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तोलून मापून आणि कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणे गरजेचे, अजित पवारांचा सल्ला

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

SCROLL FOR NEXT