Maharashtra Weather Forecast: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, पावसाबाबत हवामान खात्याची मोठी माहिती

Maharashtra Rain News: पाऊस नेमका कधी पडणार? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला असून अनेकांचे डोळे आभाळाकडे गेले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
Weather Updates Meteorological department Shocking information  rainfall in the Maharashtra
Weather Updates Meteorological department Shocking information rainfall in the Maharashtra Saam TV

Maharashtra Weather Forecast (Farmer Must Check):

जून महिन्यात राज्यात दाखल झालेल्या पावसाने जुलै महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजाने खरीप हंगामातील कामे देखील आटोपून टाकली. मात्र, ऑगस्ट महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे.

परिणामी, डोलात आलेल्या पिकांनी माना टाकल्या असून, शेतकऱ्यांच्या चितेंत वाढ झाली आहे. त्यामुळे पाऊस नेमका कधी पडणार? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला असून अनेकांचे डोळे आभाळाकडे गेले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.

Weather Updates Meteorological department Shocking information  rainfall in the Maharashtra
Pune Crime News: पती नव्हे हैवान! पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावलं; मोबाईलवर व्हिडीओही बनवले, पुण्यातील घटना

येत्या दोन आठवड्यांतही पावसाचे प्रमाण कमी असेल, अशी माहिती गुरुवारी भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच वाढ झाली असून खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे.

दरवर्षी ऑगस्टच्या १० तारखेपर्यंत राज्यात सरासरी १०० मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत पावसाची तीव्र तूट नोंदली गेली आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात राज्यात केवळ ३७.३ मिलिमीटर नोंदला गेला आहे.

१ जून ते १० ऑगस्टपर्यंतचा पाऊस लक्षात घेतला तर प्रत्यक्ष पाऊस ६४३.६ मिलिमीटर असून सरासरी पाऊस ६४१.९ मिलिमीटर असतो. त्यामुळे हा पाऊस आता सरासरीएवढाच नोंदला गेला आहे. यामध्ये रायगड, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, नांदेड या जिल्ह्यांमधील अतिरिक्त पावसाने पावसाची सरासरी गाठण्यास मदत केली

Weather Updates Meteorological department Shocking information  rainfall in the Maharashtra
Sana Khan Case: भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; चौकशीदरम्यान धक्कादायक बाब उघड

दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट पडली आहे. मराठवाड्यातील तब्बल ७६ शहरांवर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे.

दरम्यान, ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत कोकण विभाग, विदर्भ विभाग येथे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. १८ ते २४ ऑगस्ट या कालावधीतही कोकण विभागात फारसा पाऊस नसेल, असा अंदाज आहे. या आठवड्यात विदर्भ विभागात काही ठिकाणी पाऊस पडू शकेल.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com