Sana Khan Case: भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; चौकशीदरम्यान धक्कादायक बाब उघड

Sana Khan Case: सना खान प्रकरणात पोलिसांनी अमित साहू याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur Police case has been registered against Amit Sahu in Sana Khan kidnapping case
Nagpur Police case has been registered against Amit Sahu in Sana Khan kidnapping caseSaam TV
Published On

BJP Sana Khan Case: गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या नागपुरातील भाजप पदाधिकारी सना खान यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. अशातच नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातील जबलपूर येथून सना खानचा मित्र अमित साहू याच्या नोकरास अटक केली.

त्याची कसून चौकशी केली असता, आपण अमितच्या कारमधील रक्त धुतल्याची कबुली नोकराने पोलिसांना दिली. त्यामुळे बेपत्ता असलेल्या सना खानची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, असं असलं तरी हत्येच्या वृत्ताला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नाही.

Nagpur Police case has been registered against Amit Sahu in Sana Khan kidnapping case
Pune Crime News: पती नव्हे हैवान! पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावलं; मोबाईलवर व्हिडीओही बनवले, पुण्यातील घटना

दरम्यान, सना खान प्रकरणात पोलिसांनी अमित साहू याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात जबलपूर पोलीस योग्य तपास करत नसल्याने नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाचं एक पथक जबलपूरला रवाना केलं आहे.

सध्या या प्रकरणाचा शोध सुरू आहे. नागपूर येथील भाजपच्या ४० वर्षीय महिला पदाधिकारी सना खान या १ ऑगस्टला मध्यप्रदेशातील आपला मित्र अमित साहूला भेटण्यासाठी गेल्या होत्या. २ ऑगस्टला सकाळी सना खानने आपल्या आईला फोन करून जबलपूरला पोहोचल्याचे सांगितले.

Nagpur Police case has been registered against Amit Sahu in Sana Khan kidnapping case
Dhule News: बॅनर फाडल्यावरून दोन गटात वाद, संतप्त जमावाने भाजप आमदाराची कार फोडली; धुळ्यात मध्यरात्री काय घडलं?

सायंकाळी सनाचा फोन लागत नसल्याने त्यांच्या आईने अमित साहू याला संपर्क केला. मात्र त्याच्या बोलण्यातून संशय आल्याने त्यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. अमित साहू हा जबलपूरचा गुन्हेगार आहे.

मानकापूर  पोलिसांनी (Police) तत्काळ जबलपूरला एक पथक पाठवून मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने महिला पदाधिकाऱ्यासह अमित साहू आणि त्याचा भाऊ मनीष यांचा शोध घेतला. तिघांचाही काहीच सुगावा लागलेला नव्हता. तपासादरम्यान पोलिसांना त्याचा नोकर जितेंद्र गौडवर संशय आला. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. त्याने चौकशीदरम्यान अमितची गाडी धुतल्याची कबुली दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com