Buldhana Bee Attack Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या; वऱ्हाडी मंडळींवर चढवला हल्ला, लोक पळतच सुटले

Buldhana Bee Attack: डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या. त्यांनी थेट वऱ्हाडी मंडळीवर हल्ला चढवला. ही घटना बुलढाणा शहरात घडली. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात १० जण जखमी झाले आहेत.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Buldhana DJ Bee Attack

डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या. त्यांनी थेट वऱ्हाडी मंडळीवर हल्ला चढवला. सपाट्यात येईल त्या व्यक्तीला मधमाशांनी चावा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मिळेल त्या वाटेने वऱ्हाडी सैरावैरा पळत सुटले. थरकाप उडवणारी ही घटना बुलढाणा शहरात सोमवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास घडली.

मधमाशांनी केलेल्या तब्बल १० वऱ्हाडी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अवंती वावळे, रमाबाई जाधव, मायाबाई झिने, सौरभ हिवाळे, सागर जाधव, बबन जाधव, पंकज गवई, राजू गवई, राजू वाहुळे, सुभाष गवई, माया जाधव, असं जखमी झालेल्या वऱ्हाडी मंडळींचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरातील जाभरूण रोड परिसरात सोमवारी लग्नसमारंभाचा कार्यक्रम होता. दुपारनंतर वऱ्हाडी मंडळींनी नवरदेवाची वरात काढली. वरातीत डीजे लावण्यात आला होता. डीजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळी बेधुंद होऊन नाचत होते.

मात्र, डीजेच्या दणदणाटामुळे एका झाडावर असलेल्या मधमाशांना प्रचंड त्रास झाला. त्यांनी थेट वऱ्हाडी मंडळींवर हल्ला चढवला. अचानक मधमाशांनी हल्ला चढवल्यानंतर वऱ्हाड्यांची चांगलीच पळापळ झाली. दिसेल त्या वाटेने वऱ्हाडी मंडळी पळत सुटले.

मधमाशांच्या हल्ल्यात १० वऱ्हाडी मंडळी जखमी झाले. अंगावर सूज आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी देखील बुलढाण्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डीजे लावताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT