Buldhana  Saam tv
महाराष्ट्र

Buldhana : बुलढाण्यातील केस गळतीचे कारण अजूनही गुलदस्त्यात; आयसीएमआरच्या अहवालाची प्रतीक्षा

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये केस गळती होत आहे. केस गळती प्रकरणाने आरोग्य प्रशासन हा ढवळून निघाले होते. तात्काळ आयसीएमआरचे पथकही या भागात तपासणीसाठी दाखल झाले

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात गेल्या दोन महिन्यापासून केस गळतीने नागरिक हैराण आहेत. मात्र सदरची केस गळती नेमकी कशामुळे होत आहे. याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण केस गळतीनंतर आयसीएमआरने येथून काही नमुने तपासणीसाठी नेले होते. मात्र या संदर्भातील अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने कारण अस्पष्ट आहे.  

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये केस गळती होत आहे. अचानक झालेल्या केस गळती प्रकरणाने आरोग्य प्रशासन हा ढवळून निघाले होते. तात्काळ आयसीएमआरचे पथकही या भागात तपासणीसाठी दाखल झाले होते. आयसीएमआरच्या पथकाने दोन वेळेस या परिसरातील केस गळती रुग्णांचे व परिसरातील इतर वस्तूंचे नमुने तपासणीसाठी नेले. मात्र अद्यापही दोन महिने उलटूनही आयसीएमआरचा अहवाल उघड न झाल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. 

अहवाल आल्यास कारण येणार समोर 

अचानक होत असलेल्या केस गळतीमुळे शेगाव तालुक्यात खळबळ उडाली होती. मध्यंतरी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी या परिसरातील केस गळती रुग्णांच्या रक्तात सेलेनियमचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे म्हटले होते. मात्र अद्यापही आयसीएमआरचा अहवाल उघड न केल्याने या परिसरातील नागरिक भयभीत असून अनेक जण साशंक आहेत. यामुळे अहवाल लवकर आल्यास केस गळतीचे कारण समोर येऊन त्यावर उपाय करता येतील. 

प्रशासनाकडून लपवाछपवी 

जिल्हा प्रशासनही याबाबत गंभीर नसून आयसीएमआरच्या अहवालाबाबत जिल्हाधिकारी लपवाछपवी करत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आयसीएमआर फक्त फार्स तर नाही ना? परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची खेळल तर जात नाही ना? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT