Metro : बदलापूरकरांसाठी खुशखबर; लवकरच बदलापूरपर्यंत धावणार मेट्रो

Badlapur News : बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी प्रलंबित मेट्रोच्या मागणीवर कार्यवाही करण्याबाबत आमदार कथोरे यांनी मागणी केली
Metro
Metro Saam tv
Published On

मयुरेश कडव 
बदलापूर
: मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहर आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत. कारण एमएमआरडीए कडून कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ च्या ३८ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचे काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे लवकरच मेट्रो बदलापूरपर्यंत धावणार आहे. या मेट्रोमुळे भविष्यात बदलापूरकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

साधारण दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या कांजूर मार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तत्वतः मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता या मेट्रो मार्गाच्या उभारणीला वेग येण्याची चिन्ह दिसत आहेत. मेट्रो १४ च्या मार्गिकेचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी एमएमआरडीएकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून एक वर्षात या मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाची मुख्यमंत्र्यांनी बदलापूरकरांना भेट दिली असल्याचे ते म्हणाले. 

Metro
Muktainagar Crime : जळगाव हादरले; जमिनीच्या वादातून चुलत भावाची हत्या

१४ हजार ८९८ कोटींचा खर्च अपेक्षित 
मेट्रो १४ हा कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्ग ३७.८ किमि लांबीचा आहे. या मार्गावर १५ स्थानके असणार असून त्यासाठी सुमारे १४ हजार ८९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बदलापूरातुन दररोज हजारो चाकरमानी मुंबईला प्रवास करतात. यामुळे बदलापूरपर्यंत मेट्रो यावी अशी मागणी होती. त्यानुसार आमदार किसन कथोरे यांनी यासाठी पाठपुरावा करत दहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. 

Metro
Crime : महावितरणच्या रोहित्रकांची चोरी; टोळीला मुद्देमालासह घेतले ताब्यात

अखेर मिळाला हिरवा कंदील 

दहा वर्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी प्रलंबित असलेल्या मेट्रोच्या मागणीवर कार्यवाही करण्याबाबत आमदार कथोरे यांनी मागणी केली. त्यावर या प्रकल्पाला दिशा दिली जाईल. लवकरात लवकर हे काम मार्गी लावले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार या आठवड्यात मेट्रो मार्गाच्या भूसंपादनाबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यामुळे मेट्रो बदलापूरपर्यंत धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com