पिंपरी चिंचवड : महावितरणने वीजपुरवठा करण्यासाठी लावलेले रोहित्रांमधील ऑइल चोरीच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यानुसार रोहीत्रक चोरीच्या घटना पिंपरी चिंचवड शहर परिसरात समोर आल्या होत्या. याचा तपास करत असताना म्हाळुंगे पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहर व परिसरात महावितरणच्या रोहीत्रकांची चोरी होत असल्याच्या घटना घडल्या होत्या. प्रामुख्याने महाडुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील शेती व नवीन औद्योगिक वसाहत परिसरामध्ये लावण्यात आलेल्या रोहित्राची आरोपी चोरी करत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली होती. याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला असता चोरट्यांची टोळी ताब्यात सापडली आहे.
९ गुन्हे उघडकीस
दरम्यान म्हाळुंगे पोलिसांनी टोळीला ताब्यात घेतले असून टोळी कडून म्हाळुंगे पोलिसांनी रोहित्रक चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत. मोहित तेज बहादुर सिंग (वय २७) आणि आकाश अखिलेश चौबे (वय २५) अशी विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या चोरांची नावे आहेत. तसेच त्यांच्याकडून जवळपास २ लाख ३० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. विद्युत रोहित्रामध्ये असलेल्या तांब्याच्या तारांसाठी आरोपी हे रोहित्राची चोरी करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
वकिलावर जीवघेणा हल्ला
धडगाव न्यायालय परिसरात वकील अॅड. अपसिंग वडवी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या विरोधात वकील संघाने कडक निषेध नोंदवला आहे. आरोपीने न्यायालय परिसरात दंगा माजवत वळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असला तरी अद्यापही आरोपी बिनधास्त फिरत असल्याने वकील संघाने रोष व्यक्त केला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ धडगाव वकील संघाने न्यायालयातील कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.