Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : सोयाबीन-कापूस जाळून केला सरकारचा निषेध; 'एल्गार रथयात्रे' दरम्यान शेतकरी संतप्त

Buldhana News : काढणी खर्चही परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या घुसविल्या आहेत

Rajesh Sonwane

संजय जाधव 
बुलढाणा
: यंदा पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात घाट झाली आहे. या शिवाय कापूस व सोयाबीनला देखील अपेक्षित भाव नाही. या विरोधात रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी एल्गार रथयात्रा काढली आहे. यात शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले असून या रथयात्रेदरम्यान संतप्त (Buldhana) शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस जाळत सरकारचा निःशेष केला आहे. (Tajya Batmya)

सोयाबीन- कापसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्या तुलनेत बाजारात मिळणार भाव अत्यल्प आहे. त्यात भरचभर येलो मोझँक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन- कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्पादनात प्रचंड घट आली आहे. काढणी खर्चही परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी (farmer) उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या घुसविल्या आहेत. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा परिस्थितीत सरकार मात्र झोपेचे सोंग घेवून बसले आहे. निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी आज खामगाव तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांना सोयाबीन-कापूस जाळून सरकारचा निषेध केला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा 

सरकारने जर तातडीने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही; तर येणाऱ्या काळात एवढे तीव्र आंदोलन उभे करू की सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल. असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. त्यामुळे यावर्षीचे सोयाबीन- कापूस आंदोलन निश्चित पेटण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT