Buldhana Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: औषध फवारणी करताना काळजी घ्या! बुलढाण्यात आणखी चार महिलांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु

Buldhana Latest News: बुलढाणा जिल्ह्याच्या धामणगाव बढे येथे एका शेतात मका पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्यूरी नामक कीटकनाशकापासून ८ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २० जुलै २०२४

बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बडे येथे शेतामध्ये किटकनाशके फवारताना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. यामध्ये एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी चार महिलांना विषबाधा झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्याच्या धामणगाव बढे येथे एका शेतात मका पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्यूरी नामक कीटकनाशकापासून ८ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. ज्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, तर तीन जणांची प्रकृती अत्यावस्थ होती.

आता पुन्हा त्याच परिसरातील सिंदखेड लपाली येथील चार महिलांना विषबाधा झाली आहे, ज्यामध्ये एका १७ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. या सर्व महिलांवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काल दामोदर नारायण जाधव (वय,६०) आणि त्यांच्या परिवारातील सदस्य शेतात औषध मारत होते. यावेळी अचानक सर्वांना मळमळ उलट्या होऊ लागल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT