Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात वादळासह पावसाचा तडाखा; काढणीला आलेल्या केळी बागा उध्वस्त

Buldhana News : जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर या परिसरात रात्रभर पावसाच्या सरी सुरूच होत्या. संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द, काकणवाडा, कोलद, काटेल या परिसरात वादळी वाऱ्याने शेतीचे मोठं नुकसान
Buldhana Rain
Buldhana RainSaam tv

संजय जाधव 
बुलढाणा
: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने कहर केला. वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या केळीच्या बागा अक्षरशः उध्वस्त झाल्या आहेत. तर विद्युत पुरवठा करणारे खांब पडल्याने गेल्या १४ तासापासून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेलं आहे.

Buldhana Rain
Vitthal Rukmini Mandir : विठ्ठल रुक्मिणी चरणी १६ लाखाचा सोन्याचा हार अर्पण; विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले होताच ओघ सुरु

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील अनेक परिसरात ४ जूनला वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यात जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर या परिसरात रात्रभर पावसाच्या सरी सुरूच होत्या. संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द, काकणवाडा, कोलद, काटेल या परिसरात वादळी वाऱ्याने शेतीचे मोठं नुकसान झाल आहे. तर मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्या आणि पावसामुळे काढणीला आलेल्या (Banana crop) केळीच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. 

Buldhana Rain
Kalyan Crime : पार्सलचे पैसे मागितल्याने ढाबा चालकावर शस्त्राने हल्ला; वाद सोडवण्यास गेलेला तरूण जखमी

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

अनेक शेतकऱ्यांच्या (Farmer) केळीच्या बागा या उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल आहे. तर परिसरातील अनेक ठिकाणी वृक्ष कोलमडल्याने व विद्युत पुरवठा करणारे खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गेल्या चौदा पंधरा तासापासून या परिसरात वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com