Buldhana Police Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Police : सर्व शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची होणार चारित्र्य तपासणी; बदलापूरच्या घटनेनंतर बुलढाणा पोलिस विभागाचा निर्णय

Buldhana News : बदलापूर येथे शाळेतील कर्मचाऱ्यानेच चार वर्षीय दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट आहे

संजय जाधव

बुलढाणा : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई यांची चारित्र्य तपासणी करण्याबाबतचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

बदलापूर (Badlapur) येथे शाळेतील कर्मचाऱ्यानेच चार वर्षीय दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट आहे. शाळांमध्ये असे प्रकार होऊ नयेत म्हणून पोलीस प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर आले असून याच अनुषंगाने (Buldhana) बुलढाणा पोलीस प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सर्व पोलीस स्थानकांना तशा सूचना देखील दिल्या आहेत.

रेकॉर्ड ठेवणार पोलीस स्टेशनमध्ये 

पोलीस (Police) प्रशासनाच्या निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व खाजगी, सरकारी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यात सफाई कामगार, वाहन चालक, स्कूल बस चालक इत्यादी कर्मचाऱ्यांचे एका समितीद्वारे चारित्र्य तपासणी होणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड स्थानिक पोलीस स्टेशनला तयार करण्यात येणार आहे. ज्यामुळे एखादी घटना घडल्यास अशा आरोपींना शोधून काढणे सोयीचे होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghevda Bhaji Recipe: गावरान पद्धतीची घेवड्याची सुकी भाजी कशी बनवायची?

Pune : पुण्यात भेट द्यायलाच हवी अशी 5 पर्यटन स्थळे, नक्की फिरायला जा

Fraud Alert : दुबई काय नी टांझानिया काय; कुठं कुठं फिरवलं, पुण्यातील व्यापाऱ्याला ३.७९ कोटींना लुटलं, मास्टरमाईंडचा गेम

Papaya Benefits: थंडीत पपई खाल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे, आठवड्यातून २ दिवस नक्की खा

लॅपटॉपच्या दरात मोठी कपात; Jio चा Laptop चक्क 12,490 रुपयांमध्ये मिळतोय

SCROLL FOR NEXT