Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavSaam tv

Bhaskar Jadhav News : हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही जागा शिवसेना लढविणार; भास्कर जाधवांच्या विधानाने मविआमध्ये खळबळ

HIngoli News : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या विधानाने महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेत मिठाचा खडा पडला
Published on

हिंगोली : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षांची तयारी सुरु असून हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागा शिवसेना लढविणार असल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच हिंगोली व कळमदूरी मतदार संघ हा शिवसेनेच्या हक्काचा असल्याचे देखील जाधव म्हणाले आहेत.  

Bhaskar Jadhav
Dhule Laling Waterfall : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; धुळ्याजवळील लळींग धबधब्यावरील घटना

उद्धव बाळासाहेब ठाकरे (shiv Sena) शिवसेनेचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या विधानाने महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेत मिठाचा खडा पडला आहे. कारण पक्ष संघटनेच्या आढावा बैठकीसाठी मराठवाड्याच्या हिंगोलीत दाखल झालेल्या भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केले आहे. 

Bhaskar Jadhav
Amalner News : स्वस्त सोने देण्याच्या नावाने फसवणूक; २ लाख ७० हजारांत गंडा

मविआमध्ये खळबळ

दरम्यान (Hingoli) हिंगोलीच्या तिन्ही जागांवर काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघावर दावा केला आहे. यात भास्कर जाधव यांनी देखील तिन्ही जागांवर दावा केला. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआमधील जागा वाटपाच्या चर्चा सुरू होण्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विधानाने मिठाचा खडा पडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com