Buldhana Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: खेळता खेळता पाय घसरला, होत्याचं नव्हतं झालं, नदीपात्रात पडून चिमुकल्याचा मृत्यू; गावावर शोककळा

Buldhana Latest News: यश आपल्या मित्रांसोबत खेळत असताना नदीवरील पुलाजवळ पोहोचला. खेळताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट नदीपात्रात कोसळला. नदीतील पाण्याच्या वेगामुळे तो मोरीतून वाहून गेला.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १२ सप्टेंबर

Buldhana Karegaon News: खेळता खेळता पाय घसरल्याने नदीवरील पुलावरून खाली पडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात घडली. यश अरुण बोदडे असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील कारेगाव बु. येथील 7 वर्षीय यश अरुण बोदडे हा स्थानिक शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता. त्याचा नदीवरील पुलावरून खाली नदी प्रवाहात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यश आपल्या मित्रांसोबत खेळत असताना नदीवरील पुलाजवळ पोहोचला. खेळताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट नदीपात्रात कोसळला. नदीतील पाण्याच्या वेगामुळे तो मोरीतून वाहून गेला.

याबाबतची माहिती मिळताच गावकऱ्यांनी, प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम सुरु केली, परंतु तो सापडला नाही. घटनेच्या काही तासांनंतर गावातील शोध पथकाला नदीपात्रात नवीन पुलाच्या मोरीत चिमुकल्याचा मृतदेह अडकलेला दिसला, ज्यानंतर शोधपथकाच्या मदतीने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह सुरु असतानाच घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तर मृत यश बोदडे याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विद्यार्थीनीची आत्महत्या...

चंद्रपूर शहरातील इंस्पायर कोचिंग क्लासेसमध्ये नीट अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही आत्महत्या याच क्लासेसच्या वसतिगृहात करण्यात आली. प्रांजली राजूरकर असे या मुलीचे नाव असून, ती यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील रहिवासी आहे. बारावीनंतर ती इंस्पायर कोचिंग क्लासेसमध्ये नीट परीक्षेची तयार करायला आली होती. संस्थेच्या मालकीच्या वसतिगृहात ती राहत होती. बुधवारी (ता. ११ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास ती खोलीत एकटीच असताना गळफास घेतला. या आत्महत्येमागील कारण अद्याप पुढे आलेले नाही. पोलिसांनी शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेला आहे. अभ्यासाच्या तणावातून ही आत्महत्या झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

SCROLL FOR NEXT