Manasvi Choudhary
केळीच्या पानांचे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी फायदे आहेत. केळीच्या पानांची तुम्ही आहारात देखील उपयोग आहे.
नाश्त्यासाठी तुम्ही मस्त कुरकुरीत केळीच्या पानांची भजी बनवू शकता. केळीच्या पानांची भजी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
गावाकडे, तसचे कोकणात खास स्पेशल रेसिपी म्हणून केळीच्या पानांची भजी केली जातात. हिरव्या चटणीसोबत केळीच्या पानांची भजी रूचकर लागतात.
केळीच्या कोवळ्या पानांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी कुरकुरीत भजी बनवा केळीच्या पानांची भजी बनवण्यासाठी केळीची पाने, बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, हळद, मसाला, आलं - लसूण मिरची पेस्ट, तेल हे साहित्य घ्यावे.
केळीची कोवळी पाने घेऊन ती स्वच्छ धुवून घ्या. पानाचा मधला जाड देठ काढून टाका आणि पानांचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्या
एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, ओवा आलं-लसूण पेस्ट आणि मीठ एकत्र करा.
यात थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्ट मिश्रण तयार करा पीठ खूप पातळ करू नका शेवटी थोडी कोथिंबीर आणि एक चमचा गरम तेल पिठात टाका.
तयार पिठात केळीच्या पानांचे तुकडे व्यवस्थित बुडवून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये ही पिठात घोळवलेली पाने सोडा
गॅसवर मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. ही गरमागरम भजी तुम्ही पुदिना चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.