Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दोन वर्षांत १४० अपघात; २३३ जणांचा झाला मृत्यू

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग ११ डिसेंबर २०२४ ला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.

संजय जाधव

बुलढाणा : मुंबई- नागपूर असा नव्याने झालेल्या समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग झाल्याचे दिसून येत आहे. हा महामार्ग सुरु व्हायला साधारण दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. या दोन वर्षात समृद्धी महामार्गावर लहान- मोठे असे तब्बल १४० अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात २३३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात बुलढाणा जिल्ह्यात झालेला खासगी बस अपघात हा सर्वात मोठा अपघात असून यात २५ जणांचा मृत्यू झाला होता. 

बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग ११ डिसेंबर २०२४ ला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. शिवसेनेतील महाबंडानंतर उद्धव सरकार गडगडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी समृद्धी मार्ग पूर्ण झाला नसतानाही ११ डिसेंबर रोजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ झाला. एकूण ७०१ किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किलोमीटरचा मार्ग सेवेत रुजू झाला आहे.

पाहता पहाता याला दोन वर्षे झाले असून समृद्धी महामार्गने तिसऱ्या वर्षांत पदार्पण केले आहे. मात्र अजूनही काही अंतराचे काम पूर्ण होणे बाकी आहे. दरम्यान प्रारंभीपासून लहान मोठ्या अपघातासाठी गाजणाऱ्या आणि वादग्रस्त ठरलेल्या या मार्गावर डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२४ दरम्यान १४० वाहन अपघातांची नोंद झाली आहे. यात २३३ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. काही अपघातात बळींची संख्या लक्षणीय ठरली. 

राज्याला हादरविणारा अपघात 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, मेहकर आणि लोणार या चार तालुक्यातून हा मार्ग जातो. या टप्प्यात मोठ्या संख्येने लहान, मध्यम आणि मोठे अपघात झाले आहे. यात सर्वात मोठा अपघात हा बुलढाणा जिल्ह्यातच झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या लक्झरी अपघातात तब्बल २५ प्रवासी जळून कोळसा झाले होते. हा भीषण अपघात बुलढाणा जिल्हाच नव्हे तर राज्याला हादरविणारा ठरला होता. 

दीड कोटी वाहनांची वाहतूक 

दरम्यान आजवरच्या दोन वर्षांच्या कालावधीत समृद्धी महामार्गावर वाहनांची (वाहतुकीची) देखील समृद्धी राहिली आहे. या कालावधीत समृद्धी महामार्गवरून १ कोटी ५२ लाख वाहनांची वाहतूक झाली आहे. यात १ कोटी ५ लाख हलकी वाहने, पाच लाखांवर व्यावसायिक हलकी वाहने आणि ४२ लाखांवर अवजड वाहनांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT