Buldhana ACB Saam tv
महाराष्ट्र

Buldhana ACB : सहा महिन्यात लाचखोरीच्या १२ कारवाई; बुलढाणा जिल्ह्यात एसीबी पथकाची कारवाई

Buldhana News : एकूण १५ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये वर्ग एकचा १ तर वर्ग दोनच्या २ अधिकाऱ्यांचा समावेश

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना गडगंज पगार असताना देखील अजूनही लाचखोरी कमी झालेली नाही. लाचखोरी (ACB) सर्वच विभागात होत असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. हे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात मागील सहा महिन्यात एसीबी पथकांकडून झालेल्या १२ कारवायांवरून पाहण्यास मिळत आहे. (Live Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यात एसीबीच्या होत असलेल्या कारवाईवरून लाचखोरीचा आकडा समोर आला आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी एसीबीच्या उपअधीक्षक पदी शीतल घोगरे या रुजू झाल्यापासून एसीबी कारवाईचा आलेख वाढला आहे. आलेल्या तक्रारीवरून शीतल घोगरे यांनी मागील सहा महिन्यात १२ ट्रॅप केले आहेत. ज्यामध्ये एकूण १५ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या (Bribe) मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये वर्ग एकचा १ तर वर्ग दोनच्या २ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.. तर शीतल घोगरे ह्या रुजू होण्यापूर्वी जानेवारी ते जून अश्या सहा महिन्यात आठ कारवाई झाल्या आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लाचखोरीच्या कारवाया होत असताना देखील काच मागणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. यामुळे कुठल्याही शासकीय कार्यालयात काम करून देण्यासाठी पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन उप अधीक्षक शीतल घोगरे यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT