Buldhana Bus Accident Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: 'समृद्धी'वरील 'त्या' काळरात्रीला १ वर्ष पूर्ण; २५ प्रवाशांचा झोपेतच झाला होता कोळसा, मदतीच्या घोषणा हवेतच

Samruddhi Mahamarg Buldhana Bus Accident: अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठ्या भीषण अपघाताला एक वर्ष पूर्ण! २५ प्रवाशांचा मृत्यू, एकाच वेळी पेटलेल्या २४ चिता, नातेवाईकांचा मन सुन्न करणारा आक्रोश अन् आपला मृतदेह कोणता हे सुद्धा माहित नसल्याने रडायचं कुणासाठी हाच पडलेला प्रश्न? महाराष्ट्रासाठी काळरात्र ठरलेल्या या अपघातातील सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १ जुलै २०२३

१ जुलै २०२३. संपूर्ण महाराष्ट्राला भीषण अपघाताच्या बातमीने हादरवून टाकणारा दिवस. गेल्यावर्षी समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा नजीक पिंपळखुटा गावाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात होऊन बसला आग लागली होती. या आगीमध्ये २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या मन सुन्न करणाऱ्या, अंगावर काटा आणणाऱ्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले.

१ जुलैची काळरात्र, भीषण अपघाताने हादरला होता महाराष्ट्र!

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याकडे येण्यासाठी निघाली होती. ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता नागपुरातून ही बस पुण्याकडे निघाली.१ जुलैच्या रात्री दीड वाजता समोरील टायर फुटल्याने बस डिवायडरला धडकली त्यानंतर बसने पेट घेतला. या दुर्घटनेत २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता.

अपघात अग्नितांडव अन् २५ प्रवाशांचा मृत्यू

साखरझोपेत असताना ही अपघाताची बातमी समोर आल्याने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. या घटनेला आज रात्री एक वाजता एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे सिंदखेड राजा व पिंपळखुटा या गावातील नागरिकांनी रात्री दीड वाजताच्या सुमारास समृद्धी मार्गावरील अपघातस्थळी मृत प्रवाशांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केली.

एकाच वेळी २४ चिता, अश्रुंचा पूर अन् काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

ही घटना इतकी भयंकर होती की मृतदेहांचा पुर्णपणे कोळसा झाल्याने ओळखसुद्धा पटली नाही. डीएनए चाचणीही न करता आल्याने अखेर या सर्व मृतांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलडाण्यातील त्रिशरण चौकातील वैकुंठ स्मशानभूमीत हा अंत्यविधी करण्यात आला. एकाच वेळी पेटलेल्या २४ चिता, नातेवाईकांचा मन सुन्न करणारा आक्रोश अन् आपला मृतदेह कोणता हे सुद्धा माहित नसल्याने रडायचं कुणासाठी हाच पडलेला प्रश्न.. हे सगळ पाहताना प्रत्येक जण मुका झाला होता.

मदतीच्या घोषणा हवेतच विरल्या

या भयंकर अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातस्थळी भेट देऊन मृतकांना 25 लाख रुपयाची घोषणा केली होती ती रक्कम मृतकाच्या नातेवाईकांना अद्याप मिळाली नाही. यासाठी मृतांच्या नातेवाईकांनी अनेकदा आंदोलनेही केली. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने मदतीच्या घोषणा हवेतच विरल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT