Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदाराची घरवापसी होणार?ठाकरेंना भेटल्याची चर्चा

Maharashtra Politics: लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे गटाला मिळणारा सहानुभूती आणि शिंदे गटाची झालेली पिछेहाट पाहता शिंदेंचे आमदार घरवापसी करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. शिंदे गटातील काही आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदाराची घरवापसी होणार?ठाकरेंना भेटल्याची चर्चा
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये चुळबूळ सुरु झाल्याचं म्हटलं जातंय. त्यातच शिंदे गटाचे आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली. त्यामुळे शिंदे गटातील आमदार पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत का? यावरचा हा विशेष रिपोर्ट

लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये चुळबूळ सुरू झालीय. त्यातच शिंदे गटाचे नेते गोपिकिशन बजोरिया आणि विधानपरिषदेचे प्रतोद बिप्लव बजोरियांनी घरवापसीसाठी ठाकरेंचं दार ठोठावल्याची चर्चा रंगली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर शिंदे गटाच्या गोपिकिशन बजोरियांनी ठाकरेंच्या भेटीचं वृत्त फेटाळून लावलंय.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर गोपिकिशन बजोरिया आणि बिप्लव बजोरिया या पिता पूत्रांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बिप्लव बजोरियांना शिंदे गटाने विधानपरिषदेत प्रतोद पदंही दिलं. मात्र बिप्लव बजोरिया यांची विधानपरिषदेची टर्म संपली आणि 24 तासांच्या आतच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यालयात बजोरिया पिता-पूत्रांनी ठाकरेंच्या भेटीचा प्रयत्न केला पण ठाकरेंनी भेट नाकारल्याची चर्चा रंगली. मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं गोपिकिशन बजोरियांचं म्हणणंय.

40 आमदार 13 खासदार आणि शेकडो नगरसेवक सोडून गेल्यानंतरही ठाकरेंनी लोकसभेला 9 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे शिंदे गटात गेलेल्यांचे परतीचे दोर कापल्याचा संदेश ठाकरेंनी दिल्याचं म्हटलं जातंय. मात्र बजोरियांनी भेटीचं वृत्त फेटाळलं असलं तरी शिंदे गटात सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदाराची घरवापसी होणार?ठाकरेंना भेटल्याची चर्चा
Sanjay Raut : पुण्यातील लाडले भाऊ ड्रग्सच्या आहारी गेलेत; अर्थसंकल्पावरून संजय राऊतांचा महायुतीला टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com