Shinde Group Vs BJP: भाजप अन् शिंदे गटात कुरबुर? उदय सामंतांच्या गावात नारायण राणेंचे पोस्टर, कोकणात महायुतीमध्ये रंगले बॅनर वॉर!

Narayan Rane Banner In Uday Samant Village: कोकणात महायुतीचे बॅनर वॉर रंगल्याचे दिसत आहे. उदय सामंतांच्या गावात नारायण राणेंचे पोस्टर झळकले आहे.
नारायण राणेंचे पोस्टर
Narayan Rane Banner Saam Tv

अमोल कळये, साम टीव्ही रत्नागिरी

लोकसभेनंतर महायुतीमध्ये कुरबुर सुरू असल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत पहिली वादाची ठिणगी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पडल्याचं दिसत आहे. कारण खासदार नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यात बॅनर वॉर रंगलं आहे. उदय सामंत यांच्या पाली गावात भाजपचे बॅनर लागल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.

नारायण राणेंचे पोस्टर

'बाप बाप होता है..,' अशा आशयाचं उदय सामंतांच्या गावात नारायण राणेंचे पोस्टर लागले आहे. 'बाप बाप होता है.. झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है', असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला (Shinde Group Vs BJP) आहे. कणकवलीतल्या बॅनरचे पडसाद रत्नागिरीत उमटल्याचे दिसत आहे. कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष या पोस्टरच्या माध्यमातुन पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत अंतर्गत संघर्ष

याअगोदर कणकवली गावात 'वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे' अशा आशयाचे बॅनर लागले (Mahayuti Clashes) होते. या बॅनरवर किरण सामंत आणि उदय सामंत यांचा फोटो होता. याच बॅनरचे पडसाद आता रत्नागिरीत पाहायला मिळाले आहेत. कोकणामध्ये आता पदवीधर निवडणूका होणार आहेत. त्याअगोदरच महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असेल, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु सध्या उदय सामंतांच्या गावात राणेंचे बॅनर लागल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.

नारायण राणेंचे पोस्टर
Narayan Rane : नारायण राणेंनी लोकसभा जिंकली, तरीही मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू; काय आहे नेमके कारण?

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर निलेश राणेंनी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, पालकमंत्री असून देखील उदय सामंत नारायण राणेंना का लीड देऊ शकले नाही? नारायण राणेंना (Narayan Rane) रत्नागिरीमध्ये मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. तो आता या पोस्टरच्या माध्यमातून समोर आलेला आहे.

नारायण राणेंचे पोस्टर
Mahayuti Sabha: मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं? शिवाजी पार्कात देवेंद्र फडणवीसांनी 'इंडिया' आघाडीकडे मागितला हिशोब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com