Shiv Bhojan Thali Saam tv
महाराष्ट्र

Shiv Bhojan Thali : शिवभोजन केंद्रातील जेवणात आढळल्या अळ्या; खामगाव शहरातील धक्कादायक प्रकार

Buldhana News : शिवभोजन थाळी माफक दरात उपलब्ध करून दिली जात असते. यात एवढ्या दहा रुपयात पोटभरून जेवण गरिबांना मिळत असते. शासनाने हि शिवभोजन थाळी केंद्र सुरु केली आहे.

संजय जाधव

बुलढाणा : गरजू व्यक्तींना माफक दरांमध्ये चांगले भोजन मिळावे; या हेतूने शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मात्र या शिवभोजन केंद्रातील जेवणामध्ये अळ्या आढळल्याचा किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार बुलढाण्याच्या खामगावमध्ये समोर आला आहे, उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात शिवभजन केंद्रामध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकिस आला आहे. 

शिवभोजन थाळी माफक दरात उपलब्ध करून दिली जात असते. यात एवढ्या दहा रुपयात पोटभरून जेवण गरिबांना मिळत असते. शासनाने हि शिवभोजन थाळी केंद्र सुरु केली आहे. मात्र अशा पद्धतीने नागरिकांनी घेतलेले जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे शिव भोजन केंद्रामधून दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जेबाबत संताप व्यक्त केला जात असून अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वरण आणि भाजीमध्ये अळ्या 

बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथील उपसामान्य रुग्णालयाच्या बाजूला शिवभोजन केंद्र सुरु आहे. या केंद्रावरील देण्यात येणाऱ्या थाळीमध्ये अळ्या निघाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना जी थाळी दिली जाते. अन्नामधील वरण व भाजीमध्ये मृत अळ्या असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

प्रशासन काय करणार कारवाई 

अशा प्रकारे गलिच्छ भोजन देत असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडवली जात आहे. या शिवभोजन थाळी केंद्र चालकांवर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या संदर्भात अन्न व प्रशासन विभाग काय कारवाई करते हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल. मात्र हा व्हिडीओ समोर आल्याने या मोहिमेसंदर्भात शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT