Parbhani : स्मशानभूमीचा वाद; महिलेचा मृतदेह ११ तास ठेवला ताटकळत

Parbhani News : सकाळी ७ वाजताच्या सुमारास झाले. निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठीची तयारी करत नातेवाईकांनी त्यांची अंत्ययात्रा गावठाण परिसरात असलेल्या स्मशानभूमीत नेली
Parbhani News
Parbhani News Saam tv
Published On

परभणी : गावात स्मशानभूमीचा वाद असल्याने महिलेचा मृतदेह तब्बल ११ तास ताटकळत ठेवल्याचा प्रकार परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सायाळा सुनेगाव येथे घडला. याबाबत सामाजीक कार्यकर्ते गणपत भिसे यांनी आवाज उठवल्यानंतर तहसीलदार पोलीस प्रशासनाने वाद मिटवला आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र हा वाद तात्पुरता न मिटवता कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी भिसे यांनी केली आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सायाळा सूनेगाव येथील मातंग समाजाच्या गीताबाई साठे (वय ७५) यांचे निधन सकाळी ७ वाजताच्या सुमारास झाले. निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठीची तयारी करत नातेवाईकांनी त्यांची अंत्ययात्रा गावठाण परिसरात असलेल्या स्मशानभूमीत नेली. मात्र अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोह्चल्यानंतर येथे अंत्यसंस्कार करण्यावरून वादाला सुरवात झाली.  

Parbhani News
Jalna Water Shortage : जालन्यात मार्च महिन्यात पाणी पातळी घटली; फळबागा टिकवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

अंत्यविधी करण्यास मनाई 

स्मशानभूमी असलेल्या ठिकाणी दलित समाजाच्या एका व्यक्तीने ही जागा माझ्या मालकीची आहे. तुम्ही इथे अंत्यसंस्कार करू नका असे म्हणत वाद घालत अंत्यविधीला नकार दिला. त्यामुळे गावात दोन समाजात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर ही बाब मातंग समाजाचे नेते गणपत भिसे यांना कळली. त्यांनी तत्काळ गावात जात परिस्थिती समजून घेतली व याबाबत प्रशासनाला घडल्या प्रकरणी माहिती दिली. 

Parbhani News
Women Group Farming : महिलांची गट शेतीतून क्रांती; ट्रॅक्टरने सगळी कामे करतात महिला, बीडच्या देवळा गावचा आदर्श

तोडगा काढल्यानंतर ११ तासांनी अंत्यसंस्कार 

यानंतर गंगाखेडच्या तहसीलदार उषा सिनगारे, उपविभागीय पोलिस अधिकारी टिपर्से हे घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेती मालकाला समजावत तोडगा काढला. तसेच लवकरात लवकर याबाबत कायम स्वरूपी स्मशानभूमी देऊ असे आश्वासन देत शेती मालकाची समजूत काढली. यानंतर म्हणजे अखेर ११ तासाच्या नंतर सदर महिलेचा अंत्यसंस्कार पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com