Jalna Water Shortage : जालन्यात मार्च महिन्यात पाणी पातळी घटली; फळबागा टिकवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Jalna News : यंदाचा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार पाणी टंचाईची भीषणता देखील जाणवू लागली आहे.
Jalna Water Shortage
Jalna Water ShortageSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच पाण्याच्या पातळीत घट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत आटले असल्याने बोअरवेल व विहिरींचे झरे कमी झाले आहे. परिणामी शेतातील पिकांना पाणी देणे आता कठीण होऊ लागले आहे. हीच परिस्थिती जालना जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. जालन्याच्या अनेक भागात पाणी पातळी खालावल्याने फळबागा टिकविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

यंदाचा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार पाणी टंचाईची भीषणता देखील जाणवू लागली आहे. शेतातील पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यानुसार जालन्यात मार्च महिन्यातच पाणी पातळीत घट झाली असून पुढील दोन महिने जिल्ह्यातील फळबागातदार शेतकऱ्यांसमोर फळबागा जगवण्याचं मोठ आव्हान सामोरे उभा राहिल आहे.

Jalna Water Shortage
Ahilyanagar : नगर जिल्ह्यातील विखेंच्या कारखान्याची होणार चौकशी; बोगस कर्जप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दणका

बागा वाळू लागल्या 

जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरातील फळबागा पाण्याअभावी वाळू लागल्या आहे. जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांनी बारा महिने फळबागा वाढवल्या. मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यातच तापमान ४० अंशापर्यंत पोहोचल्याने वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी खालवत आहे. परिणामी पाण्याचे स्रोत देखील कमी होऊ लागले आहेत. 

Jalna Water Shortage
Ration Shop : आता रेशन दुकानात मिळणार पैसे; ऑनलाईन पॉस मशीनच्या माध्यमातून चालवली जाणार मिनी बँक

दोन महिने भीषण संकट 

दरम्यान पुढील दोन ते तीन महिने शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. यामुळे पुढील दोन महिने फळबागा टिकवण्याच मोठ आव्हान या फळबागातदार शेतकऱ्यांसमोर असणार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होणार असल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com