Ration Shop : आता रेशन दुकानात मिळणार पैसे; ऑनलाईन पॉस मशीनच्या माध्यमातून चालवली जाणार मिनी बँक

Nandurbar News : गोरगरिबांना रेशन धान्य वाटप करण्यासाठी गावागावांमध्ये रेशन दुकान आहेत. दर महिन्याला धान्याचे वाटप करण्यात येत असते. सरकारने यासाठी ऑनलाईन पॉस मशीन उपलब्ध करून दिले आहे
Ration Shop
Ration ShopSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: रेशन दुकानात गोरगरिबांना मोफत धान्याचा लाभ दिला जात असतो. मात्र याच रेशन दुकानांमधून आता पैसे मिळणार आहे. अर्थात रेशन दुकानांवर ऑनलाईन पॉस मशीनच्या माध्यमातून मिनी बँक चालवली जाणार आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रयोग राबविला जात असून रेशन दुकानावर मिनी बँक चालवणारा नंदुरबार जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे. 

गोरगरिबांना रेशन धान्य वाटप करण्यासाठी गावागावांमध्ये रेशन दुकान आहेत. दर महिन्याला धान्याचे वाटप करण्यात येत असते. सरकारने यासाठी ऑनलाईन पॉस मशीन उपलब्ध करून दिले आहे. यामुळे लाभार्थ्यांना बोटाचे ठसे घेऊन नोंदणी करत धान्य दिले जाते. आता याच पॉस मशीनच्या माध्यमातून मिनी बँक सुविधा नंदुरबार जिल्ह्यात सुरु केली जात आहे. अर्थात लाभार्थ्यांना याचा लाभ सहज घेता येणार आहे. 

Ration Shop
Sangli News: रंगपंचमी खेळला, शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला; पण बाहेर आलाच नाही, विद्यार्थ्याचा करुण अंत

८३० गावांमध्ये मिनी बँक 

आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील बँकांची कमतरता आणि बँकांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर मिनी बँक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्यातील ९०० पैकी ८३० गावांमध्ये ऑनलाईन पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वितरण सुरू आहे. आता याच गावांतील रेशन दुकानदारांनी मिनी बँकच्या माध्यमातून बँकिंग सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले. 

Ration Shop
Ahilyanagar : नगर जिल्ह्यातील विखेंच्या कारखान्याची होणार चौकशी; बोगस कर्जप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दणका

नंदुरबार ठरणार पहिला जिल्हा 

मिनी बँक हा व्यवसाय नसून सामाजिक जाणिवेतून नागरिकांना ऑनलाईन व्यवहारांची सवय लावण्यासाठी रेशन दुकानदारांनी पुढाकार घ्यावा; असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या या पुढाकारामुळे आदिवासी भागातील नागरिकांच्या आर्थिक सशक्तीकरणाला नवा मार्ग मिळणार आहे. आगामी काळात रेशन दुकानांमार्फत मिनी बँक सुविधेचा प्रभाव अधिक विस्तारण्याची अपेक्षा आहे. रेशन दुकानावर मिनी बँक चालवणारा नंदुरबार जिल्हा हा देशातला पहिला जिल्हा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com