Sangli News: रंगपंचमी खेळला, शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला; पण बाहेर आलाच नाही, विद्यार्थ्याचा करुण अंत

Dental Student Drowns in Farm Pond: सांगलीमध्ये शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रंगपंचमीच्या दिवशी ही घटना घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Sangli News: रंगपंचमी खेळला, शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला; पण बाहेर आलाच नाही, विद्यार्थ्याचा करुण अंत
Sangli News Saam Tv
Published On

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये शेततळ्यात बुडून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर हा तरुण पोहण्यासाठी शेततळ्याकडे गेला. पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला पण परत बाहेर आलाच नाही. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथे असणाऱ्या मजती यांच्या फार्म हाऊसवर रंगपंचमी साजरी करण्यात आली होती. रंगपंचमी झाल्यानंतर शेततळ्यात पोहायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. क्षीतिजकुमार कुंडलिक क्षीरसागर (२२ वर्षे) असं या तरुणाचे नाव असून तो अहमदनगर येथे राहणारा आहे. भारती डेंटल महाविद्यालयात तो शेवटच्या वर्षात शिकत होता.

Sangli News: रंगपंचमी खेळला, शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला; पण बाहेर आलाच नाही, विद्यार्थ्याचा करुण अंत
Sangli Viral Video: बस चालकाला बेदम मारहाण, सांगलीतील मिरजेमधील घटना; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल...

रंगपंचमीनिमित्त डेंटल महाविद्यालयाचे ५ ते ६ तरुण मजती यांच्या फार्म हाऊसवर रंगपंचमी खेळण्यासाठी आले होते. याठिकाणी असणाऱ्या शेततळ्यामध्ये क्षीतिज पोहण्यासाठी उतरला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी क्षीतिजसोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले.

Sangli News: रंगपंचमी खेळला, शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला; पण बाहेर आलाच नाही, विद्यार्थ्याचा करुण अंत
Sangli Crime: पुण्यानंतर सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीसोबत घडलं भयंकर, शेजारी बसून तरुणीसोबत अश्लील कृत्य

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सांगली स्पेशल रेस्क्यूस फोर्सच्या मदतीने क्षीतिजचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भारती डेंटल महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी घटनास्थळी जमा झाले होते. क्षीतिजच्या मृत्यूचे वृत्त कळताच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Sangli News: रंगपंचमी खेळला, शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला; पण बाहेर आलाच नाही, विद्यार्थ्याचा करुण अंत
Sangli Police : बसस्थानकावर चोऱ्या वाढल्या; सांगली पोलिसांनी बसस्थानकावर लावले महिला चोराचे पोस्टर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com