Buldhana Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Heavy Rain: रायपूर शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस; तालुक्याशी संपर्क तुटला

Buldhana News : रायपूर शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस; तालुक्याशी संपर्क तुटला

Rajesh Sonwane

संजय जाधव 
बुलढाणा
: हवामान विभागातर्फे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अंदाजानुसार (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर गाव परिसरात आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस (Rain) झाला. यामुळे तालुक्याशी गावाचा संपर्क तुटला आहे. (Live Marathi News)

आजपर्यंत परिसरातील नदी नाल्यांना पूर आले नव्हते. सकाळी कडक ऊन पडलेले होते. परंतु अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन या परिसरामध्ये एक तास जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी- नाले भरून गेले आहेत. संपूर्ण पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस पडला नव्हता. सोयाबीन पिकाला पावसाची अत्यंत (Heavy Rain) आवश्यकता होती. पिंपळगाव, सराई, रायपूर नदीच्या वरून पाणी वाहत असल्यामुळे जवळपास या रस्त्यावरील चार तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.

गावाचा संपर्क तुटला 

पिंपळगाव, सराई, रायपूर परिसरामध्ये आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे एका तासात नदी नाल्यांना पूर आला. आजच्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. परंतु बुलढाणा तालुक्यात रायपूर नदीला पूर आला असून बुलढाणा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

दिवसातून ४ वेळा नारळपाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Shocking: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ, रात्री व्हिडिओ कॉल करायची अन्...; नवी मुंबईत खळबळ

Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT