Buldhana Crime Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Buldhana Police: बुलडाणामध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केली. किरकोळ घरगुती वादातून आरोपीने बायकोच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत तिला जागीच संपवलं. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली.

Priya More
  • बुलडाण्यात नवऱ्याने बायकोची हत्या

  • कौटुंबिक वादातून बायकोची हत्या

  • कुऱ्हाडीने डोक्यात वार करत जागीच संपवलं

  • या घटनेमुळे बुलडाणा हादरले

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कुऱ्हाडीने वार करत नवऱ्याने बायकोला जागीच संपवलं. कौटुंबीक वादातून ही घटना घडली. या घटनेमुळे बुलडाणा हादरले. या प्रकरण पोलिसांनी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याच्या जळगावजामोद तालुक्यातील भेंडवळ बु्द्रुक गावात ही घटना घडली. कौटुंबिक वादातून नवऱ्याने रागाच्या भरता कुऱ्हाडीने डोक्यावर वार करत बायकोची हत्या केली. मायावती शहादेव भारसाकळे (वय ४६ वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शहादेव शंकर भारसाकळे असं आरोपीचे नाव आहे. नवऱ्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मायावती यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर, बुलडाण्याच्या खामगावमध्ये कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. आरोपीने लोखंडी सब्बलने बायकोचे डोकं ठेचलं. खामगाव येथील रेल्वे गेट परिसरातील झोपडपट्टी भागात ही घटना घडली. नवऱ्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बायकोचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश रूपलाल सोळंकेने (२५ वर्षे) बायको सविता प्रकाश सोळंके (२२ वर्षे) यांच्या डोक्यावर सब्बलने सपासप वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बायकोची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः खामगाव शहर पोलिस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

Cancer : फक्त दारू, सिगारेट नव्हे तर 'या' नेहमीच्या वापरातील गोष्टींमुळेही होतो कॅन्सर

७ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुवेंदू अधिकारींचा आमदारकीचा राजीनामा; राजकारणात खळबळ

Flat Stomach Tips: कोणताही व्यायाम न करता पोट होईल सपाट! फक्त बदला तुमच्या 'या' सवयी

SCROLL FOR NEXT